Viral News : कर्नाटकात 'या' नागराजाची चर्चा, 'हे' आहे कारण
Viral News : कर्नाटकामध्ये एका नागराजाची जोरदार चर्चा आहे.
Viral News : साप ह्या प्राण्याबाबत अनेक कथा श्रद्धा अंधश्रद्धा जनसामान्यात रुजल्या आहेत. समज गैरसमज आहेत. यातूनच मग कुठे साप निघाला तर नवीन कथा तयार होत असतात. याचाच प्रत्यय महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात पाहायला मिळत आहे. कर्नाटकामध्ये सध्या अशीच एक नवी कथा समोर आली आहे. खरंतर नवी कथा म्हणावी लागेल कारण, सध्या येथे एका नागराजाची जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्रच्या सीमावर्ती भागातील हालसी तुंगाव गावातील ही घटना आहे. हे गाव कर्नाटकातील भालकी तालुक्यातील आहे. या गावात मागील चार दिवसांपासून फक्त एका नागराजाची चर्चा आहे. गावात दर तीन वर्षांनी कायर नावाचा सण साजरा केला जातो. शेतातील लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कायरची पूजा केली जाते. यावर्षी याच काळात गावाच्या शिवारातील लक्ष्मी मंदिराच्या समोरील झाडावर नागराज अवतरले. ग्रामस्थाच्या लक्षात ही बाब आली.
सर्प मित्रांनी साप पकडून बाजूच्या शेतात सोडून दिला. मात्र काही वेळाने तो साप पुन्हा त्याच झाडावर दिसून आला. मग काय चर्चेला उधाण आले. आजुबाजुच्या गावात सोशल माध्यमावर फोटो व्हायरल झाले. लोकांनी लक्ष्मी मंदिरात गर्दी करायला सुरुवात केली. देवीचा आशीर्वाद, चमत्कार याच्या नावाखाली लोकांची गर्दी वाढत गेली. जितके लोक तेवढ्या कथा, तेवढे अनुभव चर्चेत येऊ लागले. नागराजासाठी दूध प्रसाद आणला गेला. मंदिरात रोज विविध कार्यक्रम सुरु झाले लोकांच्या सगळ्या कृती नागराज चक्क तीन दिवस त्याच ठिकाणी राहून पाहत होते. त्यानंतर नागराज आल्या वाटने निघुन गेले. मात्र मागे राहिल्या त्या नवीन कथा.
महत्त्वाच्या बातम्या :
- Railway Recruitment : रेल्वे सुरक्षा दलात भरतीची जाहिरात बोगस, जाहिरातीवर विश्वास ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचं आवाहन
- हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात
- North Korea : किम जोंग उनचा हेतू काय? उत्तर कोरियाकडून आठवड्याभरात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी
- Trending News : बर्फाळलेल्या काश्मीरमध्ये भारतीय जवानांचा 'खुकुरी डान्स', व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha