एक्स्प्लोर
हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात
सिंधुदुर्ग : कोकणची अर्थव्यवस्था असलेल्या हापूस आंबा संकटात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील देवगडच्या किनारपट्टी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणी सापडले आहेत.
![हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात unseasonal rains effect on Hapus Mango put mango farmers in financial crisis हापूस आंब्यावर निसर्गाची अवकृपा, अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/02/f91e56dfdc40a91e87076a369868876e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mango
सिंधुदुर्ग : कोकणची अर्थव्यवस्था असलेल्या हापूस आंबा (Alpanso Mango) संकटात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील देवगडच्या किनारपट्टी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार अडचणी सापडले आहेत. किनारपट्टी भागांतील देवगड, मालवण, वेंगुर्ले हे तालुके सिंधुदुर्गातील आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे आंब्यावर केलेल्या औषध फवारण्या वाया गेल्या परिणामी खर्च वाढला आहे. आंब्याचा मोहोर काळा पडतो किंवा आंब्याला झालेली फळधारणा गळून पडते वाया जातेय.
गेल्या काही वर्षांत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात अवकाळी पाऊस पडत आहे. तर यावर्षी जानेवारीमध्ये देवगड पट्ट्यात 7 आणि 8 तारीखेला अवकाळी पाऊस झाला. अगोदरच ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं. त्यात थंडीमुळे पुन्हा आंब्याला मोहोर आला तर काही ठिकाणी आंब्याला फळधारणा सुद्धा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकलं आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे कोकणातील हापूस आंबा उत्पादन शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांच्या आशा संपुष्टात येत असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आहेत. अवकाळी पावसाच्या अवकृपेने हापूस आंब्याचं उत्पादन घटतं आहे, परिणामी दिवसेंदिवस चित्र निराशाजनक होत आहे. अवकाळी पावसामुळे मोहोर काळा पडून नाहीसा होत आहे. मात्र थंडी पडत असल्याने पुन्हा मोहोर येतो. परंतु तो मोहोर टिकवण्यासाठी सहा ते सात वेळा फवारण्या कराव्या लागत आहेत. औषध फवारण्या करून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी यावर्षी उत्पादन चागला मिळेल या आशेवर जगत आहे.
आंबा बागेत खत, मजुरी, कीटकनाशके, रखवाली याचा खर्च उत्पादना पेक्षा जास्त होतोय. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी तोट्यात असून मेटाकुटीला आला आहे. कर्ज काढून आंबा बागायतदार औषध फवारण्या, खत व्यवस्थापन करतात. मात्र शेतकरी कर्ज काडून कर्जबाजारी होण्याची वेळ कोकणातील शेतकऱ्यांवर आली आहे. आंबा पिकावर अनेक घटक अवलंबून असतात. त्यातून अनेक उत्पादने बनवणारे कारखाने चालतात. रोजगार निर्मिती होते. मात्र आंबा पीक संकटात आल्याने त्यावर अवलंबून असलेले घटक अडचणीत सापडण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)