एक्स्प्लोर
कायम विनाअनुदानित शाळांपैकी अनुदानपात्र शाळांना अनुदान
मुंबई : राज्यातल्या कायम विनाअनुदानित शाळांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कायम विनाअनुदानित शाळांमधील अनुदानास पात्र घोषित झालेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा फायदा राज्यातल्या 90 टक्के कायम विनाअनुदानित शाळांना होणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 1628 पात्र शाळांमधील 19 हजार 247 शिक्षकांना होणार आहे. त्यामध्ये 2 हजार 452 तुकडयांचा समावेश आहे. या अनुदानामुळे 163.21 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
हे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकाचे हित जपले जाईल असा विश्वास तावडेंनी व्यक्त केला. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी राज्यभरातल्या शाळांमधील शिक्षक गेली अनेक वर्ष
आंदोलनं, उपोषण करत आहेत. आताही राज्यातल्या कोल्हापूर, लातूर, बीडमधील शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणादरम्यान गेल्याच आठवड्यात औरंगाबादमध्ये एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement