एक्स्प्लोर
'शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या शंकांचं निरसन करु'
मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या शंकांचं निरसन करण्यात येईल, असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.
तावडे आणि मेटेंनी आज अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या जागेची पाहणी केली. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला मुंबईतल्या काही मच्छिमार संघटनांनी विरोध केला आहे. त्या दृष्टीकोनातून मच्छिमारांच्या सर्व समस्यांचं निरसन करण्यात येईल असं विनायक मेटे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.
अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणारं शिवस्मारकाचं उद्घाटन सप्टेंबरमध्ये होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement