एक्स्प्लोर

विधीमंडळ : महादेव जानकरांबाबत कोण काय म्हणाले?

नागपूर: पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झाले. जानकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं सभागृहाबाहेर आणि सभागृहाच्या आतही निदर्शनं केली. महादेव जानकर यांनी आचारसंहितेचा भंग करुन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केला. नगरपालिका निवडणीदरम्यान जानकर यांनी फोनवरुन एका निवडणूक अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या संभाषणादरम्यान जानकरांनी विरोधीपक्षाच्या उमेदवारांचा अर्ज बाद करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. विधीमंडळात कोण काय म्हणालं? - सकाळी 11 च्या सुमारास विरोधकांनी विधानसभेत महादेव जानकरांविरोधात स्थगन प्रस्ताव आणला. त्यावर अध्यक्ष म्हणाले स्थगनप्रस्तावावर प्रश्नोत्तरानंतर चर्चा होईल. - विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. 'खडसेंचा काटा काढला, मग जानकरांना का वाचवता' जयंत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (सकाळी 11.10 वा) - मंत्रिमंडळातील महादेव जानकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. - मंत्र्यांनी अधिकाऱ्याला धमकावून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म रद्द करायला लावल्याबद्दल गुन्हा - कॅबिनेट मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला, त्यामुळे जानकरांचा ताबडतोब राजीनामा घ्या. - मुख्यमंत्री नेहमी क्लीन चिट देतात - मंत्र्यांनी अधिकाराचा गैरवापर करून दबाव टाकला. जाकरांनवर 120B चा अर्थात गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे - महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग करणं आणि मुख्यमंत्र्यानी पाठीशी घालणं हे थांबलं पाहिजे - जानकरांना मंत्रिमंडळात बसण्याचा अधिकार नाही.  आशिष शेलार, भाजप (सकाळी 11.12) - एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून महादेव जानकरांवर आरोप लावले, मात्र मंत्र्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं - उमेदवाराने लिहून दिलं,अपक्ष अर्ज स्वीकारा, कप-बशी चिन्ह हवं, तो मंत्र्यांना भेटला तर मंत्र्यांनी भेटू नये का? - निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर दिलं - जानकरांना दोषी धरलं नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्न नाही  विजय वडेट्टीवार, काँग्रेस (11.13) - एकनाथ खडसे साहेबांवर आरोप केले, तर काटा काढला आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला, कारवाई का नाही? - जयंत पाटील, राष्ट्रवादी  (11.14 वा.) - गुन्हा दाखल असताना मंत्री सभागृहात येणं आपल्याला योग्य वाटतं का? - मंत्रिमंडळाची बाजू मांडतो, बरोबर वाटतो का? विरोधकांची वेलमध्ये येऊन घोषणाबाजी - (सकाळी 11.15 वा). अध्यक्षांनी आक्षेप घेतला, नियमात हे बसत नाही, विरोधक जागेवर बसले नाहीत, तर हा विषय रेकॉर्डवरून काढून टाकीन -  अध्यक्षांचा इशारा - (सकाळी 11.16) वा. जयंत पाटील, राष्ट्रवादी - (सकाळी 11.22 वा). - आम्हाला बोलू देत नाही, आमची बाजू ऐकत नाही. - निवडणूक चालू असताना हे वर्तन उचित नाही -विरोधकांचा सभात्याग (सकाळी 11.22 वा).  अनिल गोटे, भाजप (सकाळी 11.24 वा). - जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला, न्यायालयात निकाल लागेल - जयंत पाटील गुलाबराव देवकर प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता तेव्हा सभागृहात बसून होते, मंत्री उत्तर देत होते तेव्हा कुठे गेला धर्म? - जयंत पाटील यांनी जानकारांबाबत बोलताना आधी स्वतःला विचारावं विधानपरिषदेही महादेव जानकरांवरुन घोषणाबाजी (दु. 12.06 वा) प्रश्नोत्तरे तास पुकारला, मात्र विरोधकांनी जानकर प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. सुनील तटकरे- राष्ट्रवादी (दु. 12.19 वा.) जानकरांवर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला. मंत्र्यांचा निवडणूक प्रक्रीयेत हस्तक्षेप केल्यासंबधी चर्चा करण्यासाठी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव - महादेव जानकरांनी निवडणूक प्रक्रीयेत हस्तक्षेप केला. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकावलं. यासंबंधी त्यांच्यावर गुन्हा  दाखल केला. जानकरांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली जावी.  शरद रणपिसे, काँग्रेस जानकरांनी राजीनामा  द्यावा. जर ते राजीनामा देत नसतील तर त्यांना बडतर्फ करावं. जानकर प्रकरणावर विरोधकांचा गोंधळ विधानपरिषद अर्धा तासासाठी तहकूब (दुपारी 12.20 )  पृथ्वीराज चव्हाण - विधानसभा (दुपारी 12.20 ) - मुख्यमंत्र्यनी जानकरांना निवडलं, माफ करायचं असेल तर क्लीन चिट द्या. पण बोलवून सांगितलं का, जबाबदारी पार पाडली का? - कस वागावं , हे सांगितलं का? हे बरोबर नाही - मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दु. 12.21 वा) - जानकर बिचारे, सज्जन -माणूस चांगला, थोडं मोठ्याने बोलतात - घाईने राजीनामा मागणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होईल -- मोटवानी यांनी दोन फॉर्म भरले एक काँग्रेस आणि अपक्ष - जानकरांनी फोन केला, सांगितलं की यांना काँग्रेसच्या तिकिटावर उभं राहायचं नाही - अपक्ष फॉर्म स्वीकार - मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला खुलासा केला, त्यात नमूद केलं मी फोन केला, दबाव टाकला नाही - मी सांगितलं त्याचा अपक्ष फॉर्म स्वीकार ,त्याला काँग्रेस फॉर्मवर लढायचं नाही - कोर्ट आदेश देईल, त्यानुसार कारवाई करू - जानकरांना अगदी राजीनामा द्या, आता घरी जा असं बोलणं योग्य नाही - जानकर तुम्ही घाबरु नका - तुमच्या मते जाणकारांचं किती महत्व ते आम्हालाही कळलंय   दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी (दु. 12.25 वा. ) - जानकरांबाबत TV वर आलेलं चुकीचं असेल तर चॅनेल वर कारवाई करा - मंत्र्यांनी केलेलं आहे, काय शिक्षा देणार, न्यायालय काय शिक्षा देणार - TV वर संभाषण आहे, अजून पुरावे द्यायची गरज नाही - गंभीर विषय आहे विधानपरिषदेत जानकारांवरुन गोंधळ. सभागृह 1 वाजेपर्यंत तहकूब महादेव जानकरांचा नेमका वाद काय? गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या. यासंबंधिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. संबंधित बातम्या 'खडसेंचा काटा काढला, मग जानकरांना का वाचवता' दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Embed widget