एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2021 LIVE Updates : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Vidhan Parishad Election 2021 : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला जागांसाठी आज मतदान, मतदानाच्या 12 तासआधी नागपुरात काँग्रेसवर उमेदवार बदलायची नामुष्की

Key Events
Vidhan Parishad Election 2021n LIVE Updates voting today for two seats in legislative council direct fight between mahavikas aghadi and bjp Vidhan Parishad Election 2021 LIVE Updates : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Vidhan Parishad Election 2021

Background

Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला (Akola) बुलढाणा (Buldhana)-वाशिम (Vashim) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नागपुरात काँग्रेसनं काल (गुरुवारी) ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिलं आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होत आहे. 

निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

नागपुरात भाजपचं पारडं जड 

नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. नागपूरात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात सध्या तरी भाजपचं वर्चस्व दिसत आहे. त्यामुळे नागपूर विधानपरिषद निवडणूक ही चुरशीची होणार आहे. 

नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार होते. परंतु निवडणुकीला काही तास शिल्लक असताना कॉंग्रेसने भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत.

अकोला-बुलढाणा-वाशिम विधानपरिषदेवर कोणाचं वर्चस्व? 

विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. एकूण 822 मतदार असून, यात 387 महिला तर 535 पुरुष मतदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मतदार निर्णायक ठरणार आहेत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून  देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करुनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे. मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम दर्शवावा लागेल. पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवावा लागणार आहे. 

अकोला-बुलढाणा-वाशिममधील जिल्हानिहाय मतदार

जिल्हा मतदार 
अकोला 287
वाशीम 168
बुलढाणा 367

 

13:58 PM (IST)  •  10 Dec 2021

नागपूरात दुपारी 12 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत आहेत. 12 वाजेपर्यंत 140 मतदारांनी आपला मताधिकार बजावला.
 

10:42 AM (IST)  •  10 Dec 2021

बुलढाणा विधानपरिषदेसाठी आज मतदान, 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत केवळ 4 जणांनी केलं मतदान

बुलढाणा : विधानपरिषद निवडणूक अपडेट

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंतच्या दोन तासात फक्त चार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

देऊळगाव राजा - 1, मेहकर - 1 , जळगाव जामोद - 2  = दोन तासात 4 मतदान

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Actress Nivetha Pethuraj Wedding Called Off: पलाश-स्मृती पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार थाटण्यापूर्वीच मोडला? होणाऱ्या नवऱ्याला केलं अनफॉलो, साखरपुड्याचे फोटोही डिलीट
पलाश-स्मृती पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार थाटण्यापूर्वीच मोडला? होणाऱ्या नवऱ्याला केलं अनफॉलो, साखरपुड्याचे फोटोही डिलीट
Embed widget