एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; संध्याकाळपर्यंत 98 टक्के मतदानाची नोंद

Vidhan Parishad Election 2021 : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला जागांसाठी आज मतदान होतंय. प्रतिष्ठेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.

Vidhan Parishad Election 2021 :  विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. नागपूर  मतदार संघात संध्याकाळपर्यंत 98.93 टक्के मतदान तर विधान परिषदेची अकोला-वाशिम-बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यात  98.30 टक्के मतदानाची नोंद झाली.

विधान परिषदेची अकोला-वाशिम-बुलडाणा या  तिन्ही  जिल्ह्यात 98.30 टक्के मतदानाची नोंद झाली. या तीन जिल्ह्यातील एकूण  822 पैकी 808 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. तर नागपूर  मतदार संघ निवडणुकीसाठी आज 98.93 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत होते. मतदान संपेपर्यंत 554 मतदारांनी आपला मताधिकार बजावला. एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते.  पाच  मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

नागपुरात भाजपचं पारडं जड 

नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. नागपूरात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

अकोला-बुलढाणा-वाशिम विधानपरिषदेवर कोणाचं वर्चस्व? 

विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. एकूण 822 मतदार असून, यात 387 महिला तर 535 पुरुष मतदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मतदार निर्णायक ठरणार आहेत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून  देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करुनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे. मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम दर्शवावा लागेल. पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवावा लागणार आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोपAnjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानियाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget