Videocon Venugopal Dhoot: वेणूगोपाल धूत यांच्याशी कनेक्शन असलेले राजकीय नेते देखील सीबीआयच्या रडारवर? नेत्यांचे व्हिडीओकाॅन कनेक्शन तपासण्याची शक्यता
ICICI Bank Loan Scam: आयसीआयसीआय बॅंक कर्ज प्रकरणातील पैसे काही राजकीय व्यक्तींना वळते झाल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे ते कुठे वळते झालेत याचा देखील तपास सीबीआय करणार आहे.
ICICI Bank Loan Scam: व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती वेणूगोपाल धूत (Venugopal Dhut) यांना न्यायालयाने सीबीआय (CBI) कोठडी सुनावली आहे. कोचर दाम्पत्य आणि धूत यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. अशात केंद्र आणि राज्यातील काही राजकीय नेते देखील सीबीआयच्या (CBI) रडारवर असण्याची शक्यता आहे.
केंद्र आणि राज्यातील नेत्यांचे व्हिडीओकॉन कनेक्शन तपासणार?
सीबीआयकडून वेणूगोपाल धूत यांना अटक झाली आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) कर्ज घोटाळ्यासंबंधित अनेक नवे खुलासे होण्याचा अंदाज आहे. सीबीआयकडून धूत यांचे राजकीय संबंध देखील सीबीआय तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयसीआयसीआय बॅंक कर्ज प्रकरणातील पैसे काही राजकीय व्यक्तींना वळते झाल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे ते कुठे वळते झालेत याचा देखील तपास सीबीआय करणार आहे.
वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला आयसीआयसीआय बॅंकेकडून (ICICI Bank) कर्ज (Loan) मिळाले. या कर्जातील काही रक्कम ही राजकीय व्यक्तींना वळती झाली आहे का? याचा तपास देखील सीबीआय करणार असल्याची माहिती आहे. सोबतच राजकीय पक्षांना देखील पैसे वळते झालेत का याचा देखील तपास होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आयसीआयसीआयच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक असताना चंदा कोचर (Chanda Kochar) यांच्या काळात कॉंग्रेसशी संबंधित असलेल्या एका बड्या उद्योगपतीला कर्ज मंजूर झालं होतं. त्यासंबंधी देखील चौकशी सीबीआयकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे चंदा कोचर यांचा देखील पाय आणखी खोलात जाऊ शकतो. वेणूगोपाल धूत यांचे मोठे प्रस्त हे महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मराठवाड्याचे आहे. सोबतच वेणूगोपाल धूत यांचे भाऊ हे राज्यसभेचे माजी खासदार होते. त्यामुळे या कर्जाचं काही महाराष्ट्र कनेक्शन (Maharashtra Connection) आहे का? याचा देखील तपास होण्याची शक्यता आहे.
उद्योगपती आणि राजकीय नेत्यांचे संबंध अगदी जुने आहेत. अनेक नेत्यांच्या मदतीनं मोठे उद्योग उभे देखील राहिले आहेत. अशात व्हिडीओकॉन (VideoCon) -आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) कर्ज घोटाळ्यात देखील तसे काही कनेक्शन आहे का? याचा तपास होऊ शकतो. त्यामुळे केंद्र आणि राज्यातले काही नेते देखील सीबीआयच्या रडारवर येण्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या :