एक्स्प्लोर

ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई

ICICI Bank Loan Scam: आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सीबीआयने वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे.

ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत (Venugopal Dhut) यांना सीबीआयने अटक (CBI Arrest) केली आहे. कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. चंदा कोचर (Chanda Kochar) आणि दिपक कोचर (Deepak Kochar) पाठोपाठ सीबीआयकडून आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा (ICICI Bank Loan Scam) प्रकरणातील तिसरी अटक करण्यात आली आहे. 

आर्थिक नियमितता आणि कर्ज प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. 

आज कोर्टात होणाऱ्या सुनावणीत सीबीआयकडून चंदा कोचर आणि दिपक कोचर यांची सीबीआय कोठडी वाढवण्याची मागणी सीबीआयकडून विशेष कोर्टात होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, वेणूगोपाल धूत यांचीही कोठडी मागण्यात येणार आहे. या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, असा मुद्दा सीबीआयकडून कोर्टासमोर मांडण्यात येण्याची शक्यता आहे. 

प्रकरण काय?

 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हीडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचे कर्ज दिले होते. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. मात्र सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. 

या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचं सीईओपद सोडावं लागले होते. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हीडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला होता. 

इतर महत्त्वाची बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Jayan Patil & Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Tweet on Waqf Board : वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाहीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaNana Patole : बहुमताच्या नावावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नयेJayant Patil Full Speech : राहुल नार्वेकरांचं कौतुक; जयंत पाटलांचं सभागृहात भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Jayan Patil & Ajit Pawar: अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
अजित पवार म्हणाले, तुम्ही प्रतिसाद देत नाही, जयंत पाटील म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय!
Suniel Shetty : पहिल्यांदा बहिणीकडून ओळख काढली; घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
बाईक राइडवर प्रेमात, घरच्यांना समजावण्यात 9 वर्ष गेली अन् 10 दिवस लग्नाचा जंगी कार्यक्रम; धर्माची भिंत तोडलेल्या सुनील शेट्टीच्या प्रेमाची कहाणी
Mohammed Shami : रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
रोहित शर्माचा मेसेज पोहचला, टीम इंडियाच्या वाघाने फोडली डरकाळी; मैदानात षटकार अन् चौकारांचा पाऊस
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
सुषमा अंधारेंचे बनावट औषध पुरवठा प्रकरणी तानाजी सावंतांवर गंभीर आरोप म्हणाल्या, 'ठरवून समांतर व्यवस्था उभी केली'
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Embed widget