मुसळधार पावसाची सर्वत्र दाणादाण! ग्रामपंचायत कार्यालयाला पुराचा वेढा, सरपंचांनी थेट पुराच्या पाण्यात पोहत ग्रामपंचायत गाठलं!
Heavy Rain : विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु असून नागपूरसह पूर्व विदर्भातील (Vidarbha Rain Update) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: धो-धो धुतलंय.
Vidarbha Rain Update : विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकट्या नागपूर शहरात(Nagpur News) आज शनिवार 20 जुलैच्या पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 या तीन तासात 81.8 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या बाबतची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केलं असून नदी नाले दुतर्फा ओसंडून वाहू लागले आहेत. अशातच नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मरून नदीला पूर आल्यामुळे नक्षी या गट ग्रामपंचायतीअंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे.
परिणामी, ग्रामपंचायतीशी आणि तालुक्याशी या गावाचा संपर्क तुटला आहे. गावात येणारे सर्व मार्ग बंद असल्यामुळे प्रशासनही मांगली गावात पोहचू शकत नव्हते. त्यावेळी गावाचे 28 वर्षीय सरपंच अनिकेत वराडे यांनी स्वत: पुराच्या पाण्यात पोहत मांगली गावात पोहोचले आणि मांगली गावकऱ्यांना दिलासा दिलाय. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सध्या परिसरात कौतुक केलं जात आहे.
सरपंचांनी थेट पुराच्या पाण्यात पोहत ग्रामपंचायत गाठलं!
गेल्या दोन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. एकट्या नागपूर शहरात पाहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले ओढे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे.
अशातच जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मरून नदीला पूर आल्यामुळे नक्षी या गट ग्रामपंचायतीअंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. परिणामी सर्वत्र गाव पाण्याने वेढले आहे. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढत या गावाचे 28 वर्षीय सरपंच अनिकेत वराडे यांनी स्वत: पुराच्या पाण्यात पोहत मांगली गावात पोहोचले आणि मांगली गावकऱ्यांना दिलासा दिलाय.
गडचिरोली जिल्ह्यात 40 पैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद
पावसाची ही परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मोठे मार्ग तर 10 लहान मार्ग असे एकूण 13 मार्ग वाहतूक साठी बंद झाले आहेत. आज सकाळी 8.30 वाजता Manual rain gauge station चे नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण सरासरी 79.2 मि.मी. पाऊस झालेला आहे, 40 पैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली असुन धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मंडळमध्ये सर्वाधिक 156.4 मि.मी. पावसाची नोंद आहे.
जिल्ह्यात पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
2) अहेरी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला ता. अहेरी
3) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा
4) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता. अहेरी
5.) जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा
6) पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा
7) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा
8) कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा
9) करवाफा पोटेगाव रस्ता
10)मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता ता. कुरखेडा
11,) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा
12) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज
13) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला
इतर महत्वाच्या बातम्या