एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन
गंगाधर पानतावणे यांना यंदाच साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
![ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन Veteran marathi literature gangadhar pantawane passes away ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचं निधन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/27074944/gangadhar-pantawane.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद: ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि विचारवंत गंगाधर पानतावणे यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. एमआयटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गंगाधर पानतावणे यांना यंदाच साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती भवनात 20 मार्चला या पुरस्काराचं वितरण झालं होतं. त्यानंतर अवघ्या सातच दिवसात गंगाधर पानतावणे यांची प्राणज्योत मालवली.
गंगाधर पानतावणे यांनी विविध विषयाची मुशाफिरी केली. दलित्य साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत त्यांचं भरीव योगदान आहे.
महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची विचारधारा साहित्याच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, पानतावणे यांनी केलं.
दलित साहित्य आणि दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक होते.
गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालं. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं.
खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलं.
त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती, शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.
गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)