एक्स्प्लोर

Yogi Adityanath In Mumbai: मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या; काँग्रेसची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Yogi Adityanath In Mumbai: मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिंदे-फडणवीस सरकार पायघड्या घालत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Yogi Adityanath In Mumbai:  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गुंतवणुकीसाठी मुंबई उद्योजकांसोबत बैठका घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई (Mumbai) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे (Maharashtra) महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

 नाना पटोले म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्वतःच न्यायालय व न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात बुलडोझर चालवून गोरगरिब व सामान्य माणसांची घरे जमीनदोस्त करते. महिला, अल्पसंख्याक, दलित समाज योगींच्या राज्यात सुरक्षित नाही, ते भयभित होऊन जीवन जगत आहेत. योगी आदित्यनाथ हे धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करतात आणि ज्या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण केले जाते व सरकार चालवले जाते त्या राज्यात कोणता उद्योगपती गुंतवणूक करण्यास धजावेल? असा सवाल त्यांनी केला. मात्र, महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या मदतीने उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी व महाराष्ट्राचे महत्व कमी व्हावे यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीचे सरकार आणले असावे असे वाटते, असा संशयही पटोले यांनी व्यक्त केला. 

आधी चित्रपट उद्योगाची बदनामी, आता त्यांच्यासाठी पायघड्या

मुंबईतील चित्रपट उद्योगावर योगी आदित्यनाथ यांचा डोळा आहे. हा उद्योग उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्यासाठी याआधीही भाजपाकडून अनेक खटपटी करण्यात आल्या. मविआचे सरकार असताना अनेक निर्माते, अभिनेते व अभिनेत्रींना बदनाम करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईतील चित्रपटसृष्टी नशाबाजांचा अड्डा असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा एकदा चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असून त्याला राज्यातील खोके सरकार मदत करत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. 

गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शोची गरज काय?

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योगपतींना आवाहन करण्यासाठी मुंबईत आल्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे. मग गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची काय गरज आहे? उद्योगपती काय रस्त्यावर उभे राहून भेटणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. गुंतवणुकीच्या नावाखाली केवळ मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील खोके सरकार कामाला लागले आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Verification : लाडकी बहीण अर्जाची पडताळणी होणार, अपात्र बहिणींचं काय?Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Embed widget