एक्स्प्लोर

7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुनगंटीवार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणं जुळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई : 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसंच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं. पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे. Maharashtra Govt Formation | पाच वर्षांपूर्वी 31 ऑक्टोबरला शपथविधी, यंदा मुहूर्त कधी? विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र? विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणं जुळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करण्याची शक्यता आहे. शिवसेनेशिवाय सरकार स्थापन केल्यास नवीन सभागृहात हंगामी अध्यक्ष आधी सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील आणि त्यानंतर नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह इतर पक्ष विरोध करू शकतात. या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास शिवसेना आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल : संजय राऊत उद्धव ठाकरेंनी ठरवलं तर राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला आहे. शिवाय, शिवसेनेनं ठरवलं तर शिवसेना आवश्यक ते बहुमत सिद्धही करु शकते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. संजय राऊतांनी काल (31 ऑक्टोबर) शरद पवारांची भेट घेतल्यानंतर चर्चाला उधाण आलं होतं. त्यानंतर आज राऊतांनी पुन्हा एकदा आक्रक पवित्रा घेत भाजपला इशाराच दिला आहे. Maharashtra Government Formation | ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुनगंटीवार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024: मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 26 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji | आध्यात्मिक सत्याच्या अनुभवाची पाच मिनिटंABP Majha Headlines :  7 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024: मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी?
Horoscope Today 27 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
Congress Candidate List: मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
मला वांद्र्यातून उभं राहायचं होतं पण अंधेरीतून उमेदवारी मिळाली, मला लढायचं नाही; काँग्रेसच्या सचिन सावंतांच्या मागणीने ट्विस्ट
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
Embed widget