एक्स्प्लोर
परदेश दौऱ्यावर जाण्याऐवजी कुलगुरुंनी विद्यापीठातील कामासाठी वेळ द्यावा : राज्यपाल
मुंबई : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील कुलगुरुंच्या परदेश दौऱ्यांवर राज्यपालांनी कात्री लावली आहे. वारंवार परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या कुलगुरुंनी विद्यापीठांच्या कामासाठी वेळ द्यावा, यासाठी महिन्याभरापूर्वीच राज्यातील सर्व कुलगुरुंना परदेश दौरे आवरते घेण्याबद्दल सुनावलं होतं.
राज्यपालांनी परदेश दौऱ्याबद्दल निर्देश दिल्यानंतरही अनेक कुलगुरुंचे दौरे सुरुच राहिल्याने राज्यपालांनी कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांचे जर्मनी, दक्षिण कोरिया आणि चीनमधील दौरे रद्द करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात डॉ. संजय देशमुख यांनी इस्त्राईल, मॉस्को आणि चीन याठिकाणी भेट दिली आहे. पण कुलगुरुंच्या नवीन निर्देशांमुळे जर्मनीचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
काय म्हणाले कुलगुरु?
"मी विद्यापीठाच्या खर्चाने परदेश दौऱ्यांवर जात नाही. मला निमंत्रण देणाऱ्या संस्थेकडून हा खर्च उचलला जातो. याआधी मी राज्यपालांच्या परवानगीनेच परदेश दौरे केले आहेत." असं डॉ. संजय देशमुख यांनी सांगितलं आहे.
परदेश दौऱ्यासाठी परवानगी आवश्यक
पाच वर्षांच्या कार्यकाळात कुलगुरूंनी 50 दिवसांहून अधिक राहू नये, असे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या कार्यालयाने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना बजावले होते. तसंच या दौऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गृह विभाग आणि परराष्ट्र विभागाकडून परवानगी घेतल्याशिवाय दौरे करु नयेत असेही निर्देश दिले होते.
कुलगुरुंच्या परदेश दौऱ्यांमुळे त्यांचं विद्यापीठातील कामकाजाकडे दुर्लक्ष होतं, तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांची भेटही मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे फ्रान्स, इंग्लंड आणि आयर्लंड येथून आलेली निमंत्रणेही कुलगुरुंना नाकारावी लागतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement