एक्स्प्लोर

Rohit Pawar: गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत, रोहित पवारांचं उदाहरणासह प्रेझेंटेशन, अजितदादांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

Rohit Pawar:आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या, यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एआयबी किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होते, याआधी त्यांनी मुंबईसह दिल्लीत देखील पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे मांडले होते, अशातच दोन दिवसांपर्वी आलेल्या डीजीसीएच्या (DGCA)च्या अहवालाबाबत आज काही मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, मी व्हीएसआर किंवा डीजीसीए यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर, डीजीसीए  आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट मी करत नाही, मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे हे आपल्याला दिसून येत आहे, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्व नियोजीत दौरा नव्हता आपण म्हटला होतं तेही मान्य करण्यात आले आहे. ॲाफिशियल ऐजच्या ३००० तास जास्त हे विमान चालले होते. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एएआयबी (AAIB) किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते असं म्हणत रोहित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं, तर...

त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट दाखवत, अहवालात मांडलेले मुद्दे सांगत सविस्तर माहिती देताना म्हटलं की, व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. हे दिसून येत आहे, पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसीक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं, तर डोक्याला लागली की पोटात लागली, जर डोक्यात लागली असेल तर इथे(अहवालात) सांगण्यात आलंय की छातीत लागली, इथे बेसिक निरीक्षण(Observation)एआयबी या संस्थेचं चुकलंय असं आमचं मत आहे, असंही रोहित पवारांनी सांगितलं आहे.रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलंय, इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न  एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

AAIB च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमच नाव देखील नाही

झाडांना धडकून विमान खाली पडल असं रिपोर्टमधे लिहील आहे. मुळात झुडुपला देखील विमान धडकलं नाही, AAIB च्या अहवालात इन्वेस्टिगेशन टीमच नाव देखील नाही. यापूर्वी २०२३ च्या मुंबई विमान अपघात प्रकरणात तपास अधिकाऱ्यांच नाव होतं. व्हिजिबलिटी कमी होती. आमचं म्हणणं आहे की अॅरोचा मनोज पवार याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण त्याने व्हिजिबिलिटी ठीक असल्याची माहिती दिली होती. DGCA ने व्हीआयपी प्रवासासाठी त्यागी समिती नेमून अत्यंत कडक नियम बनवले होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, व्हिजिबिलिटी नसेल तर विमान उड्डाण करायचं नाही. तरीदेखील विमानने उड्डाण केलं कसं?, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

नियम असताना सुद्धा हा नियम का लावला गेला

इथे चर्चा आहे ती अनेक झाडांचा विचार केला जातोय. एआयबीने रिपोर्ट द्यायचा म्हणून दिलाय का कारण इथं छोटी झुडपं आहे. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीचा गुन्हेगारी तपास व्हायला पाहिजे, कारण स्थानिक काही लोकांचे म्हणणे आहे की काही दिवसांपूर्वी काही लोक रेकी करायला आले होते. याचा देखील तपास व्हायला हवा आहे. त्याचबोरबर व्ही. के. सिंग याने मुंबईत झालेल्या अपघातातील सगळे अवशेष दिल्लीला नेले होते असे कळतेय. क्रिमीनल ॲंगलने तपास व्हावा असे आम्हाला सांगतात, पण यात केवळ पुन्हा अपघात होऊ नये याबद्दल सांगितले आहे. ॲरोवर एफआयआर करा, मी असं का म्हणतो. कारण त्यानेच ही माहिती दिली होती की व्हिजिबिलिटी सगळं ठीक आहे, व्ही. के. सिंग हे आणि त्यांचा इन्शुरन्स एजंट सगळे या प्रकरणाला कॅज्युअली घेत आहे. ते अनुभवी पायलट होते त्यांना धावपट्टीची सगळी कल्पना होती. नियम असताना सुद्धा हा नियम का लावला गेला. नियम सांगतो की व्हीआयपी असताना व्हिजिबिलिटी कमी असताना सुद्धा त्यांनी हे विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. अंडर लॅाग इन होतं होतं. अंडर लॅाग करून जास्त उडलेले विमान कमी उडवायचे दाखवले गेले.  वैमानिक मात्र त्याने किती तास विमान चालवले याचे योग्य लॅाग इन करतो. हे विमान शमशाबादला जाणार आहे, याबाबतची माहिती बारामती एअरपोर्टला माहिती नव्हतं. कारण हे विमान मुंबई ते बारामती बारामती ते मुंबई असेच उडणार होते. 

ब्लॅक बॅाक्सचा फोटो देणे अपेक्षित होते तो दिला नाही

पुढे रोहित पवार म्हणाले, या विमानात एक्ट्रा इंधन भरण्यात आले होते. ९०-९५ टक्के इंधन भरण्यात आले होते ते का? मुद्दाम भरले का जर तुम्ही हैद्राबादला जाणार होते. दादा विमानात बसण्याच्या वेळा या वेगवेगळ्या आहेत, मग हा रिपोर्ट मुद्दाम बदलला जात आहे का? ब्लॅक बॅाक्सचा फोटो देणे अपेक्षित होते ते दिला नाही, ब्लॅक बॅाक्सचे फोटो का दिले नाहीत. 2023 साली मुंबईत व्हीएसआरच्या लेअरजेटचा अपघात झाला होता. त्या इनव्हेस्टिगेशन टीममध्ये के. रामचंद्र हे इन चार्ज होते आणि इन्व्हेस्टिगेटर म्हणून आनंदन यांच् नाव दिलं होतं. पण अजित दादांचा अपघात जो झाला, त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहीलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील, असा दावा रोहित पवार यांनी केला. यात मॅनिप्युलेशन , कागदपत्रांची हेराफेरी आणि इतक्या गोष्टी होणार आहेत, तर नावचं देऊ नका, म्हणजे उद्या कोणावरही आक्षेप घ्यायला नको, अशी भूमिका असावी, असंही रोहित पवार म्हणाले.

2023 साली जो अपघात झाला, व्ही. के सिंग यांनी स्वत:च्या प्रायव्हेट ट्रकमध्ये ,विमान पडलं, ब्लॅकबॉक्सपासून सगळं स्वत: हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला कळलं आहे. मग अजित दादांच्या बाबीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा प्रश्न आमच्या मनात आहे. हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का केला जातो, ही शंकाही आमच्या मनात आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

विमान लँड करण्याची परवानगी कशी ?

या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली,  टेक ऑफ करायला कसं दिलं असा सवाल उपस्थित करत एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप रोहित पवारांनी केला.  दोन्ही पायलट्सना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना 29 नंबर कुठला आणि 11 नंबर कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय असंही रोहित पवारांनी सांगितलं.  व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, असं त्यागी समितीने म्हटलं आहे. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही लँड करण्यात आलं, असं आरोप रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालात काय काय? (Ajit Pawar Plane Crash Report)

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून प्राथमिक अहवाल प्रसिद्ध
लॅंडिंगवेळी दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर, VFR नियमांनुसार आवश्यक किमान दृश्यमानता 5 किमी गरजेचे 
उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके
बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड, रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवे बाजूस विंडसॉक नाही, संरक्षक भींत अपुरी सारख्या त्रुटी आढळल्या 
पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड, दुसऱ्या प्रयत्नात रनवे वर लँडिंग क्लीअरन्स, पायलटने “Field in sight” कळवलं
अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज
विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले
दोन्ही पायलट यापूर्वी बारामती येथे उड्डाण करून गेले होते आणि त्यांना त्या विमानतळाच्या भौगोलिक रचनेची पूर्ण माहिती होती
दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (SSFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (SSCVR) हे विमानाच्या अवशेषांतील त्यांच्या मूळ जागी
दोन्ही रेकॉर्डर्स अवशेषांमधून बाहेर काढण्यात आले असून, डेटा पुनर्प्राप्ती आणि पुढील विश्लेषणासाठी पाठवला 
अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर्स उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे उपकरणांना उष्णतेमुळे नुकसान
फ्लाईट डेटा रेकाॅर्डरचा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड 
काॅकपिट व्हाॅइस रेकाॅर्डर डेटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व तांत्रिक कौशल्य हे निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे, अशात अमेरिकेच्या मानांकननुसार डेटा रिट्रॅक्ट केला जाणार 
प्रवासाआधी दोन्ही वैमानिकांकडून मद्यपान करण्यात आलं नव्हतं, टेस्ट निगेटिव्ह

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget