कोरोना शेतकऱ्यांच्या जीवावर; कृषीमंत्री दादा भुसे यांची केंद्राकडे मदतीची मागणी
कोरोना संकटामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सर्व राज्यातील कृषीमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी कृषीमंत्री दादा भुसे यांची केंद्राकडे मदतीची मागणी केली.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता 21 दिवस देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी याचा फटका विविध क्षेत्रांना बसला आहे. शेतकऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. आधी अवकाळी आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. या पार्श्वभूमीवर देशाचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सर्व राज्यातील कृषिमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतीची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यात मांडले. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज सर्व राज्यातील कृषीमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी सर्व राज्याचे कृषीमंत्री आणि वरीष्ठ अधिकारीची उपस्थित होते. राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी यावेळी राज्याचा आढावा सादर केला. शेती, शेतकरी, शेतमजूर आणि शेतीमाल यांच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीवर यादरम्यान चर्चा झाली. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातून रब्बी हंगाम गेला असून पुढचा हंगाम सावरण्यासाठी मदतीची मागणी करण्यात आली. द्राक्ष, केळी, संत्रा, आंबा आदी फळांना फटका बसल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. निर्यात आणि देशांतर्गत दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी सहकार्य करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना बियाणे 10 वर्षानंतर वापरण्याची परवानगी केंद्रीय कृषि मंत्र्यांनी दिली. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ 50 टक्के शेतकऱ्यांना मिळत नसल्याचंही कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
आमदार मौलाना मुफ्ती यांची वागणूक चुकीची मालेगांवचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी क्वॉरंटाईन असताना एका कार्यक्रमाला हजेरी लावली, ही कृती चुकीची असल्याचे मत कृषीमंत्री दादा भुसे यांनी मांडले. मात्र, आमदार मुफ्ती मर्कजच्या कार्यक्रमाला गेले होते की नाही याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. कारण, आमदार स्वतः गेले नाही असे सांगत असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र बंद असताना मालेगावमध्ये पॉवर लूम चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर मालेगावमधील 80 टक्के पॉवर लूम बंद असल्याची माहिती त्यांनी दिली.
Rajesh Tope | महाराष्ट्र अजूनही तिसऱ्या टप्प्यात नाही, सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावा : राजेश टोपे