एक्स्प्लोर
अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे
अण्णांनी लढा सुरुच ठेवावा मात्र उपोषण थांबवावं असं आवाहनही उद्धव ठाकरेंच्या वतीनं करण्यात आलं आहे. अण्णांच्या आमरण उपोषणाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या, हा प्रकार संतापजनक असल्याचंही शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Social activist Anna Hazare's fast-unto-death entered the third day at Janter Manter in New Delhi on Thursday 7 April 2011. (Photo: IANS)
मुंबई : अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सरकारला केलं आहे. अण्णांनी लढा सुरुच ठेवावा मात्र उपोषण थांबवावं असं आवाहनही उद्धव ठाकरेंच्या वतीनं करण्यात आलं आहे. अण्णांच्या आमरण उपोषणाला पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या, हा प्रकार संतापजनक असल्याचंही शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दरम्यान अण्णा हजारेंची प्रकृती खालवल्याची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
अण्णांनी लढा उभारावा, शिवसेना त्यांच्या सोबत असेल असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
अण्णांची प्रकृती ढासळली, ग्रामस्थ आक्रमक, महाजन राळेगणसिद्धीला निघाले
अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. अण्णांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर देखील चिंतेत आहेत. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा राळेगणसिद्धीच्या दिशेनं निघाले आहेत. त्यांना अण्णांची समजूत काढण्यात यश येतं का हे पाहणं महत्वाचं आहे. याआधीही गिरीश महाजन अण्णांना भेटले होते. मात्र मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. तुम्ही आश्वासन देऊन चालणार नाही अशी भूमिका अण्णा हजारेंनी घेतली होती.
दुसरीकडे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर- पुणे महामार्गावर सुपा येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले. यावेळी नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यामुळे अण्णांची प्रकृती ढासळली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसंच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिलं तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांचे 3.5 किलो वजन कमी झाले आहे. उपोषण सुरूच ठेवले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अण्णा हजारेंची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस
राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाप्रकरणी अण्णा हजारे यांनी नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अण्णा पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. नवाब मलिकांनी जाहीर लेखी माफी मागावी आणि तसा खुलासा करावा, अन्यथा नवाब मलिकांविरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करावे लागतील अशा स्वरुपाची नोटीस नवाब मलिकांना पाठवण्यात आली आहे. अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान मलिकांनी केलेल्या या आरोपांबद्दल खुद्द अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी
राज्यात लोकयुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
संबंधित बातम्या
अण्णांची प्रकृती ढासळली, ग्रामस्थ आक्रमक, महाजन राळेगणसिद्धीला निघाले
अण्णा हजारेंची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस
जीवाचं बरं वाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार धरेल : अण्णा हजारे
चौथ्या दिवशी अण्णांचे वजन साडे तीन किलोने घटले
दोन दिवसांपेक्षा अधिक काळ उपोषण करणं अण्णांच्या शरीराला शक्य नाही
अण्णा हजारेंचं आंदोलन सुरु, गिरीश महाजनांचा हिरमोड
लोकायुक्ताबाबत अध्यादेश काढा, अण्णा हजारे आंदोलनावर ठाम
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























