एक्स्प्लोर
युतीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंची सेना मंत्र्यांसोबत तातडीची बैठक
मुंबई : निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या गोटामध्ये खलबतांना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक होणार आहे. बैठकीत युती होणार की नाही, याबाबत निर्णय होण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे भाजप नेत्यांच्या चर्चांना वेग आला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये, म्हणून युती गरजेची असल्याचं मत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल राज्यभरातले पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं.
नगरपालिका निवडणुकीत भाजप हा एक क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फारसा फटका बसलेला नाही. त्यामुळे राज्यातला काँग्रेस पक्ष कमकुवत करायचा असेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती आवश्यक असल्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडल्याचं कळतं.
युती तुटली, तर भाजप आणि शिवसेनेच्या संघर्षात काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी स्थानिक पातळ्यांवर युतीची चर्चा सुरु करण्याचे आदेशही दिले गेल्याचं समजतं.
मुंबईत भाजप स्वबळावर लढल्यास भाजपला शंभरहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून बांधण्यात आला आहे. उलट युती केल्यास त्याचा लाभ शिवसेनेला अधिक होण्याची चिन्हं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
भाजपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भाजप स्वबळावर लढल्यास शंभरच्या आसपास जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अगदी कमीतकमी म्हणजे 85 जागा तरी निश्चित मिळवता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन 100 पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या नेत्यांचा कल आहे.
दुसरीकडे स्वबळावर लढल्यास प्रचारात शिवसेना-भाजपमधील संबंध कमालीचे बिघडतील. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेची मुख्यमंत्री फडणवीस यांना काहीशी चिंता भेडसावत आहे. तरी स्वबळावर लढून निवडणुकांचे निकाल पाहून कल्याण-डोंबिवली प्रमाणे पुढची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
...म्हणून युती गरजेची, खलबतांनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट मत
स्वबळावर लढल्यास भाजपला 100+ जागा, पक्षाच्या सर्वेक्षणाचा अंदाज
मुंबई जिंकण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांची राजकीय थडगी इथेच बांधली: शिवसेना
शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचा पारदर्शी अजेंडा नेमका काय?
‘युती नको, विकास हवा’…ठाण्यात भाजपची पोस्टरबाजी
भाजपच शिवसेनेचा शत्रू नंबर 1, नागपुरात शिवसैनिकांचा सूर
शत्रू कोण हे पाहू नका, लढाईसाठी सज्ज राहा : मुख्यमंत्री
स्थानिक पातळीवर युतीशिवाय जिंकू शकतो, रावसाहेब दानवेंना विश्वास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement