Devenedra Fadanvis On Uddhav thackarey: 'फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक', उद्धव ठाकरेंचा वार; फडणवीसांनीही केला पलटवार, म्हणाले...
Devenedra Fadanvis On Uddhav thackarey: उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात भाजपवर हल्लाबोल केला आहे. तर फडणवीसांनी देखील ट्वीट करत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Devenedra Fadanvis On Uddhav thackarey: फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती. त्याला आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंना कलंकीचा काविळ झाला आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेचा (Uddhav Thackarey) समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून नागपुरातील सभेमध्ये त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती.
नागपुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात फडणवीसांचं राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही हे वक्तव्य ऐकवलं आणि टीकेची झोड उठवली. तर सिंहासन चित्रपटातील प्रदेशाध्यक्षाप्रमाणे बावनकुळेंची अवस्था झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी ‘कलंकीचा काविळ’असा उल्लेख केला आहे. तर कलंक या शब्दामुळे त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल करत अनेक घटनांची उजळणी देखील केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरेंना उत्तर दिलं आहे. स्वत: कलंकित असलो की कलंकित दिसायला लागतात असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. तर तुम्हाला कलंकीचा काविळ झाल्याचं देखील यावेळी फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘कलंकीचा काविळ’ !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 10, 2023
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान… pic.twitter.com/efd6rdG8d2
'देवेंद्रजी कलंक नाही तर महाराष्ट्र भूषण'
तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील ट्विट करत ठाकरेंना उत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस हे कलंक नाही तर महाराष्ट्र भूषण आहेत. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की 'उद्धवजी तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही.' भाजपकडून आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे या राजकीय वार पलटवारांनी नागपुरातील वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र सध्या आहे. तर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडत ठाकरेंचा निषेध देखील केला आहे.
हे ही वाचा :