उदयनराजेंची उमेदवारीसाठी पळापळ, घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार; दिल्लीत होणार फैसला
Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीचा फैसला आज दिल्लीत होण्याची शक्यता आहे.
Udayanraje Bhosale In Delhi : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Lok Sabha constituency) भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, उदयनराजेंची उमेदवारीसाठी पळापळ पाहायला मिळत आहे. कारण महायुतीत (Mahayuti) अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) देखील सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे उदयनराजे थेट दिल्लीत पोहचले असून, अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंनी घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीचा फैसला आज दिल्लीत होण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील या जागेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. त्यामुळे उदयनराजेंची उमेदवारी देखील धोक्यात आल्याची चर्चा आहे. सर्व घडामोडी पाहता उदयनराजे थेट दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत. रात्री त्यांची भेट होऊ शकली नसली तरी आज भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उदयनराजेंच्या उमेदवारीचा फैसला थेट दिल्लीतच होणार आहे.
उदयनराजे घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार...
सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समाजाला जातो. त्यामुळे अजित पवार गटाने महायुतीत या जागेवर दावा केला आहे. मात्र, उदयनराजे भाजप पक्षात असून, त्यांना भाजपकडूनच उमेदवारी हवी आहे. तर, उदयनराजे घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यावर आता तोडगा कसा काढाला जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
फडणवीसांच्या बैठकीत तोडगा नाहीच?
भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवारीच्या यादीत उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अशात मंगळवारी रात्री उशिरा उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली होती. मात्र, या बैठकीत देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने आता उदयनराजे थेट दिल्लीत पोहचले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :