एक्स्प्लोर
Advertisement
जमीन व्यवहार प्रकरणात मिर्ची गँगच्या दोघांना अटक
इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हारून युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटक आरोपींची नावं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं नाव आता या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहे.
मुंबई : ईडीतर्फे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकेकाळी जवळ असलेल्या इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हारून युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटक आरोपींची नावं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं नाव आता या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहे.
ईडीतर्फे गँगस्टर आणि त्यांच्या अनधिकृत धंद्यांवर सध्या कारवाई सुरु आहे. या कारवाईत ईडीतर्फे इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 आक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
आरोपी रंजित सिंग बिंद्रा याने 200 कोटींच्या जमीन व्यवहारात दलाली केली होती तर हारून युसूफ याने पैसे ट्रान्सफर आणि लॉजीस्टिक्स उपलब्ध करून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही आरोपी इकबाल मिर्ची गँगचे असून जमीन प्रकरणात दोघांची महत्त्वाची भूमिका होती .
मेमन इकबाल मोहम्मद उर्फ इकबाल मिर्ची आणि त्याच्या गँगवर हत्येचा प्रयत्न, खंडणी, ड्रग्स अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. इकबाल मिर्चीच्या विरोधात 1994 सालानंतर इंटरपोलने नोटीस काढली होती. मात्र मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यानंतर तो दुबईला निघून गेला आणि नंतर त्यांने आपला बेस लंडन मध्ये शिफ्ट करून घेतला. पुढे लंडनमधेच इकबाल मिर्चीचा मृत्यू झाला.
काय आहे प्रकरण ?
मिलेनियम डेव्हलपर्स वरळी येथे सी जे व्यावसायिक इमारत 2006-2007 मध्ये बांधली होती. 2007 मध्ये या इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला मिर्ची परिवाराला मिलेनियम डेव्हलपर्सकडून देण्यात आला होता. हा व्यवहार संशयास्पद असल्यामुळे ED या प्रकाराची चौकशी करत आहे.
इकबाल मिर्चीच्या संपत्तीची यादी
- जवळपास 500 कोटी पेक्षा जास्त किंमतीची संपत्ती मिर्चीकडे
- मुंबईतील वरळीत सीजे हाऊस, साहिल बंगला, समंदर महल
- खंडाळ्यात 6 एकरचा बंगला
- मुंबईतील भायखळा येथे न्यू रोशन टॉकीज
- मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये तीन दुकाने
- जुहू येथे हॉटेल
- पाचगणी येथे आलिशान बंगला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement