Maharashtra police : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! गृह विभागाचे आदेश
Maharashtra police : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. महाराष्ट्र गृह विभागाचे याबाबतचे आदेश काढले आहेत.

मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश गृह विभागाने काढला आहे. यामध्ये 109 वरिष्ट पोलिस आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आलाय. या बदल्यांमध्ये अनेक पोलिस अधिकारी मुंबईतून बाहेर पाठविण्यात आले आहेत. तर बाहेरून देखील अनेक अधिकारी मुंबईत रुजू होणार आहेत.
पोलिस अधिकारी प्रणय अशोक यांची मुंबईहून नवी मुंबईला तर मंजुनाथ शिंगे यांची सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून राज्य पोलिस महासंचालक कार्यलयात नियुक्ती करण्यात आली आहे. तर चर्चेत राहिलेले डीसीपी अकबर पठाण पुन्हा मुंबईत आले आहेत. पठाण आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह सात जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली झाले त्यांनी मिळालेल्या नव्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया देखील येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यामुळे बदली झालेले वरिष्ठ अधिकारी पुढील दोन ते तीन दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होतील.
प्रियांका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता जी. पाटील, राहुल उत्तम श्रीरामे, सागर पाटील, विवेक पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, स्वप्ना गोरे, प्रकाश गायकवाड, दिपाली काळे यांच्यासह राज्यातील 109 अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वी देखील शिंदे सरकारकडून अचानक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी राज्यातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि राज्य पोलिस सेवेतील दोन अशा 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
Police Bharti 2022 : पोलीस भरती : नाशिकच्या पहिल्या आणि आताच्या जाहिरातीत 290 जागांचा फरक, उमेदवारांमध्ये संभ्रम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
