Police Bharti 2022 : पोलीस भरती : नाशिकच्या पहिल्या आणि आताच्या जाहिरातीत 290 जागांचा फरक, उमेदवारांमध्ये संभ्रम
Police Bharti 2022 : नाशिक (Nashik) पोलीस भरती 9Police Bharati) पहिल्या आणि आताच्या जाहीर केलेल्या जाहिरातीच्या पदसंख्येत मोठी तफावत आढळत आहे.
Police Bharti 2022 : राज्याच्या गृह विभागाने ग्रामीण पोलीस दलातील पोलिसांच्या भरतीसाठी यापूर्वी जाहीर केलेली पदसंख्या व आत्ताच्या जाहीर केलेल्या पदसंख्येत मोठी तफावत आढळत आहे. ऑक्टोंबरमध्ये गृहविभागाने नाशिक ग्रामीण साठी 454 पोलीस शिपायांची पदे जाहीर केली होती, मात्र आता फक्त 164 पोलीस शिपाई आणि पंधरा चालकांचीच रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस व गृह विभागाच्या गोंधळामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकारने 2021 अंतर्गत राज्यात पोलीस भरती जाहीर केले असून रविवारी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. येत्या नऊ नोव्हेंबरपासून ही भरतीप्रक्रिया सुरु होणार असून राज्यातील त्या त्या जिल्ह्याना जागांचा तपशील जाहीर केला आहे. मात्र नाशिकच्या रिक्त जागांबाबत उमेदवार नाराजी पार्सली आहे. कारण पोलिसांच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाने ऑक्टोबर अखेरीस यापूर्वीची जाहिरात जाहीर केली होती, पण भरतीला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर कोरोना काळात उमेदवारांचे वाढलेले वय आणि रोजगाराची गरज विचारात घेता तीन वर्षे वयोमर्यादा वाढवण्यात आली. त्यानुसार राज्यभरात नऊ नोव्हेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत असून आयुक्तालयांसह पोलिस अधीक्षक कार्यालयांनी भरतीच्या रिक्त जागा घोषित केले आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने आता 164 पोलीस शिपायांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या गृविभागाने जाहीर केलेल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीत तफावत आढळून आली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या जाहिरातीत 454 पोलीस शिपाई पदे जाहीर केली होती. भरतीच्या स्थगितीनंतर नव्याने जाहीर झालेल्या अहवालात मात्र 290 जागांची घट झाली आहे. यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या भरती प्रक्रियेत नाशिक ग्रामीण मध्ये केवळ 164 पोलीस शिपाई आणि 15 चालक पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस व गृह विभागाच्या या अजब गोंधळामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्य पोलीस दलात मनुष्यबळ अल्प असून 2021 अंतर्गत पोलीस भरती जाहीर झाले आहे.
09 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या भरतीचा तपशील पोलिसांच्या प्रशिक्षण व खास पथकाने ऑक्टोबर अखेरी जाहीर केला होता. मात्र काही कारणास्तव भरतीला स्थगिती देण्यात आली. यानंतर कोरोना काळात उमेदवारांचे वाढलेले वय आणि रोजगारची गरज विचारात घेता तीन वर्ष वयोमर्यादा वाढण्यात आली. त्यानुसार राज्यभरात नऊ नोव्हेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होत असून आयुक्तालयासह अधीक्षक कार्यालयांनी भरतीचा रिक्त जागा घोषित केल्या आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने आता रिक्त असलेल्या 164 पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. मात्र 27 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण व खास पथके विभागाने जाहीर केलेल्या अहवालच्या नाशिक ग्रामीण मध्ये 454 मध्ये भरण्यात येतील असे नमूद केलेले होते. अचानक नव्याने जाहीर अहवालामध्ये 290 जागा गायब झाल्याचे समोर आले आहे. यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ असून राज्यभरात रिक्त जागांमधील तफावत आणखी कोणत्या जिल्ह्यात झाली आहे, याकडे उमेदवारांच्या लक्ष लागले आहे.
जागा नाशिकच्याच कमी झाल्यात का?
राज्य पोलीस विभागाने भरतीची एकत्रित अधिसूचना रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर केली नव्हती. विविध आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाने स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार पुणे शहर 720, नवी मुंबईच्या 204, धुळे ग्रामीण ४२, वर्धा ग्रामीण 90 ही पोलीस शिपायांची रिक्त पदे पूर्वी नुसार जाहीर झाली. त्यामुळे केवळ नाशिक ग्रामीण पोलिसांच्याच जागा कमी झाल्यात का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नाशिकच्या वाट्याला जागा इतर कोणत्या जिल्ह्यांना दिल्या का अशी चर्चा सुरू झाली आहे.