Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 31 जुलै 2022 : रविवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी, सांगलीच्या संकेत सरगरची रौप्य पदकाला तर गुरुराजची कांस्यला गवसणी, आज भारत-पाक महिला क्रिकेट सामन्याकडे लक्ष
2. रात्री दिल्लीचा दौरा आटपून मुख्यमंत्री शिंदे सकाळी औरंगाबादेत दाखल, मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय झाला की नाही याची उत्सुकता शिगेला
3. 25 वर्षे गप्प का होता?, आनंद दिघेंचे पुतणे केदार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, दिघेंबाबत घडलेल्या घटनेचे साक्षीदार असल्याचं म्हणत शिंदेंचा ठाकरेंना इशारा
4. व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी स्वप्ना पाटकरांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, तपासानंतर पोलीस पुढची कारवाई करणार, क्लिपमध्ये धमकावल्याचा राऊतांवर आरोप
5.अटकेत असलेले व्यावसायिक अविनाश भोसलेंचं ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त, 34 हजार कोटींच्या DHFL- येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची कारवाई
6. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईतील बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाची पाहणी, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बुलेट प्रकल्पाच्या कामाला वेग
7.राज्यात पावसाचा जोर कमी, अतिवृष्टीमुळं आत्तापर्यंत राज्यात 112 जणांचा मृत्यू
8.मान्सूनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; पुणे, दिल्लीपेक्षाही चांगली, SAFARच्या अहवालातून माहिती समोर
9. आज लोकलचा अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जंबो ब्लॉक, हार्बरवरही ब्लॉक मात्र पनवेल-कुर्ला विशेष सेवा
Mumbai Mega Block Updates : लोकल रेल्वेला (Local Railway) मुंबईची लाईफ लाईन म्हणतात. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.
10. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दुसऱ्यांदा कोरोना संक्रमित, आगामी कार्यक्रम रद्द