Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 19 एप्रिल 2022 : मंगळवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या नियमावलीसाठी आज महत्त्वाची बैठक, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्तांसह सर्व जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित राहणार
2. मनसेच्या भोंग्यासंदर्भातल्या भूमिकेवरुन राजकारण तापलं असतानाच आज राज ठाकरेंनी बोलावली बैठक, तर मशिदीवरचे भोंगे कायम ठेवण्यासाठी रझा अकदामीची धाव
3. राणेंच्या अधीश बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार कायम, बांधकाम नियमिततेचा अर्ज फेटाळला, सूड बुद्धीनं कारवाई होत असल्याचा राणेंचा आरोप
4. बलात्काराच्या आरोपप्रकरणात भाजप आमदार गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार, राज्य महिला आयोगाकडूनही कारवाईचे निर्देश, नवी मुंबई पोलिसांकडूनही तपास सुरु
5. नागपूरचे मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख, सलग दुसऱ्यांदा भारतीय लष्कराची जबाबदारी मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे
New Army Chief : भारतीय लष्कराला एका पाठोपाठ एक दोन मराठमोळे लष्करप्रमुख लाभले आहेत. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हे देखील मराठमोळे असून ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आणखी एका मराठी लेफ्टनंट जनरल यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपविण्यात येणार आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt gen Manoj Pande) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Chief of the Army) असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 19 एप्रिल 2022 : मंगळवार
6. दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, निकालासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक
7. अॅमवेला ईडीचा मोठा दणका, देशभरातल्या कारवाईत तब्बल 757 कोटींची मालमत्ता जप्त, मल्टि लेव्हल मार्केटिंग व्यवहार केल्याचा आरोप
Amway Money Laundering Case : नेटवर्क मार्केटिंग कंपनी अॅमवेवर (Amway) अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) मोठा झटका दिला आहे. ईडीने कंपनीची 757 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने कंपनीच्या पाच ऑफिसवर छापेमारी केली.
ईडीला तपासादरम्यान आढळले की, अॅमवे (Amway) कंपनी नेटवर्क मार्केटींगच्या (Network Marketing) च्या नावाखाली 'पिरॅमिड फ्रॉड' करत होती. कंपनीच्या यादीत आणखी सदस्य जोडून त्यांची कागदावरच विक्री करत असल्याचे तपासात समोर आलं आहे. कंपनीचे सदस्य होऊन लोक श्रीमंत होतील असं सांगत कंपनीकडून मल्टीलेवल मार्केटींग सुरु होती.
8. चार मुलं जन्माला घाला आणि दोन संघाला द्या, साध्वी ऋतंबरा यांच्या वक्तव्यानं वादाला तोंड
9. पाच टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव, 5 टक्क्यांच्या स्लॅबमधील वस्तू-सेवा 3 टक्के आणि 8 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये वर्ग करण्याची शक्यता
10. निर्बंधमुक्तीनंतर पहिलाच अंगारकीचा योग, सिद्धिविनायकाचं थेट दर्शन घेण्यासाठी मुंबईकरांच्या रात्रीपासून रांगा, सियाचीनमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना