(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 17 ऑक्टोबर 2022 : सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होणार, अजित पवारांसह 76 संचालकांच्या ईडी चौकशीची शक्यता, क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहित याचिका
राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी (State Cooperative Bank Scam) पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 76 संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहीत याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यामधून सातत्यानं पुन्हा चौकशी करण्याती मागणी केली जात होती. त्यामुळेच, अजित पवार आणि 76 संचालकांसह पुन्हा ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे.
राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीमार्फत पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचं प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांमधून पुन्हा चौकशी करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती. या याचिकांना उत्तर देताना आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्यासंदर्भात लेखी पत्रक लिहून कळवलं आहे. या याचिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
2. एक हजार 79 ग्रामपंचायतींमध्ये कोण गुलाल उधाळणार याची उत्सुकता शिगेला, काल झालेल्या निवडणुकांचा आज निकाल, माझावर विशेष कव्हरेज
3. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल ठाम, तर बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांवर दबाव वाढला
4. काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज निवडणूक, मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत, 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळणार
5. हर हर महादेव सिनेमाच्या निमित्त सुबोध भावेंकडून राज ठाकरेंची मुलाखत, राजकारणात सध्या ओरबाडणं सुरु, ते थांबलं पाहिजे, सध्याच्या राजकारणावर राज यांची टीका
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 17 ऑक्टोबर 2022 : सोमवार
6. मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी यलो अलर्ट
7. गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या 40 पर्यटकांना वाचवण्यात यश, मुसळधार पावसामुळे मांडवी नदीला पूर
8. मुंबईच्या घरासाठी निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर, दिवाळीचा मुहूर्त हुकणार, सॉफ्टवेअर अपडेट करण्याच्या प्रक्रियेमुळे विलंब
9. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला मिळणार जनरेटर, पालकमंत्री भुमरेंच्या दंत उपचारादरम्यान बत्तीगुल झाल्यानंतर प्रशासनाला जाग, 5 वर्षांनी प्रस्ताव मंजूर
10. दिवाळीच्या तोंडावर 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा होणार, आजपासून पंतप्रधान शेतकरी योजनेचा बारावा हप्ता