(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 11 सप्टेंबर 2022 : रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. मुंबईतील दादर-प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटात राडा, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील वादाचं हाणामारीत पर्यावसन, सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा ठाकरे गटाचा आरोप
Shivsena Vs Shinde : शिवसेना आणि शिंदे गटातील धुसफूस (Shivsena Vs Shinde Group) वाढू लागली आहे. मुंबईतील प्रभादेवीत (Prabhadevi) गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर आज मध्यरात्री मोठा राडा झाला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केला. यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मध्यरात्री सुरू झालेल्या राड्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पडदा पडला. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनबाहेर पडले. राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.
2. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आजपासून, कालच्या बैठकीत शरद पवारांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
3. मोदी आणि पवारांमधील सुसंवादामुळे 'यूपीए' सरकार मागे लागली असतानाही अमित शाह यांना जामीन; शिवसेनेचा गौप्यस्फोट
4. व्यापाऱ्यांना बाप्पा पावला, गणेशोत्सावादरम्यान बाजारपेठेतील उलाढालीत 30 टक्क्यांनी वाढ, निर्बंधमुक्त उत्सावामुळे तेजी
5. आमदार लता सोनवणेंचं जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, सोनवणे यांची आमदारकी धोक्यात, शिंदे गटाला धक्का
6. राज्यभरातील जनावरांचा आठवडी बाजार बंद, तर कोल्हापुरातील जत्रा रद्द, लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीची पावलं
7. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात खासगी लक्सरी बसला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
8. आजपासून मुंबईतील वांद्र्यात 'माऊंट मेरी' जत्रेला सुरुवात, 'मोत माऊली'च्या दर्शनाला लाखो भाविक
9. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली
10. आशिषा चषक क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना, पाकिस्तान आणि श्रीलंका संघात टक्कर, सलग चार विजय मिळवणाऱ्या लंकेचं पारडं जड