एक्स्प्लोर
आर्ची-परश्याच्या कार्यक्रमाची तिकीटं खपेना, लातुरातील कार्यक्रम रद्द
लातूर: लातूरच्या क्रीडा संकुलात 'सैराट'च्या टीमचा उद्या होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समजते आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यानं हा कार्यक्रम रद्द केला असल्याचं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सैराटच्या टीमसोबत 'चला हवा येवू द्या'ची टीम देखील येणार होती.
लातूरमधील शाळेच्या मदत निधीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, क्रीडा संकुलावरच्या मैदानावर खड्डे पडल्यामुळे या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असल्याची माहिती समजते आहे. या कार्यक्रमाला आर्ची, परशासह सैराटची टीम येणार होती.
कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यान कार्यक्रम रद्द करत असल्याचं कारण शाळेच्या वतीनं देण्यात आलं आहे. दुसरीकडे या कार्यक्रमाला छुपा विरोध असल्यानं कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement