एक्स्प्लोर

Todays Headline 3 November 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मतदान आणि भाजपचा रोजगार मेळावा, आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Todays Headline : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. भाजपच्या उमेदवारानं माघार घेतली आहे, त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय, पण अपक्ष उमेदवार आणि नोटाच्या मोहिमेमुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहेच, त्याशिवाय मुंबईत राज्य सरकारनं रोजगार मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केलं आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रं मिळणार आहेत. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत...  

कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री पंढरपुरात -
कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरात दाखल होणार आहेत. संध्याकाळी 5.45 वाजता कोर्टी (कराड चौक) ते वाखरी (बाह्यवळण रस्ता) भुमिपूजन, संध्याकाळी 6 वाजता वारकरी दिंडीसाठी राखीव, संध्याकाळी 7 वाजता पंढरपूर विकास आराखडा बाबत बैठक घेणार आहेत. 

RBI ची पतधोरण समितीची बैठक -
 आरबीआयची आज पतधोरण समितीची बैठक होणार आहे. महागाई दर नियंत्रणात आणण्यास आरबीआयला अपयश येत असल्यानं यासंबंधीची काय कारणं आहेत? यासंदर्भातला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार आहे. या बैठकीत यासंदर्भातल्या कारणांविषयी चर्चा केली जाणार आहे. सोबतच फेडकडून व्याजदर वाढवल्यास आरबीआयवर देखील दबाव राहू शकतो. अशात महागाई नियंत्रणात आणण्यास आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करु शकते.

गुजरातचा निवडणुक कार्यक्रम आज जाहिर होणार?
गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यासाठी आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्यामुळे लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकारच्या वतीने मुंबईत रोजगार मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत अशी टीका होत असताना राज्य सरकारकडून मिळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याला ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महासंकल्प राज्य शासनाने केला आहे. त्याचे औचित्य साधून आज राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. निवड झालेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान -
अंधेरी पूर्व  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) आड मतदान होणार आहे.  6 नोव्हेंबरला  निकाल लागणार आहे.  रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी येथे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. पण भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघार घेतल्यामुळे निवडणुकीतली चुरस संपली आहे. मात्र इतर अपक्ष असे मिळून एकुण सात उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार आणि नोटाच्या मोहिमेमुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीचा नवीन आमदार कोण हे सहा नोव्हेंबर रोजी सर्वांसमोर येणार आहे.

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ईडीचं समन्स -
कथित खाण घोटाळ्याप्रकरणी ईडीनं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स पाठवलं आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने आज 11:30 वाजता चौकशीसाठी बोलवलं आहे. ईडीनं 19 जुलै रोजी पीएमएलए नियमांनुसार हेमंत सोरेन यांचे विश्वासून पंकज मिश्रा यांना अटक केली होती. 

बीकाजी फूड्सचा आयपीओ लाँच होणार -
पाणीपुरी, कचोरीसह चॅट आयटम्ससाठी प्रसिद्ध असलेलं बीकाजी फूड्स कंपनीचा आयपीओ आज बाजारात येणार आहे.  गुंतवणूकधारकांना सात नोव्हेंबरपर्यंत आयपीओ घेता येणार आहे. आयपीओमधून 1,000 कोटी रुपये उभारण्याचा बिकाजीचा मानस आहे. याशिवाय कंपनीचे प्रवर्तक ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत 2.94 कोटी शेअर्स विकतील. चारही कंपन्यांचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

नवाब मलिक यांच्या स्वास्थ्य संदर्भातील वैद्यकीय समिती गठीतसंबंधीचा निर्णय?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या पार्श्वभुमीवर आज नवाब मलिक यांच्या स्वास्थ्य संदर्भातील वैद्यकीय समिती गठीतसंबंधीचा निर्णय कोर्ट देण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या तब्येतीसंदर्भात सत्यशोधन समितीमार्फत तपासणी व्हावी अशी ईडीची मागणी आहे. 

भाजपने मिशन 45  -
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मिशन 45 अभियान या आधीच सुरू केलं आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहातील

दादा भुसे महापालिका विकास कामाचा आढावा घेणार -
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आज महापालिका विकास कामाचा आढावा घेणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत शिंदे गटाचा मंत्री एका महिन्यात दुसऱ्यांदा बैठक घेतोय. तसेच या बैठकीला इतर आमदार किंवा लोकप्रतिनिधींना अमंत्रण नसल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. या व्यतिरिक्त दादा भुसे रोजगार मेळावा, सप्तश्रृंगी गड विकास आराखडा बैठक अशा विविध महत्वपूर्ण बैठक घएणार आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे 8 दिवसाचे अलतिमेटम दिल्यानं आज आढावा घेणार आहेत.

संजय राठोड अमरावती दौऱ्यावर - 
मंत्री संजय राठोड आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध विभागांत 75 हजार नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ म्हणून राज्य शासनाच्या, तसेच महामंडळाच्या आस्थापनेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रम मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता नियोजन भवनात होणार आहे.

विजयकुमार गावित नंदुरबारमध्ये -
नंदुरबार येथील वन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज मंत्री विजयकुमार गावितांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेतील सत्तां नाट्यानंतर सर्वपक्षीय राजकीय नेते या कार्यक्रमासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत -
टी 20 विश्वचषक अंतिम टप्प्याकडे जात आहे. ग्रुप ब मध्ये भारताने बांगलादेशचा पराभव करत रंगत आणखी वाढवली आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील निर्णायक सामना होणार आहे. पाकिस्तान संघाला विजय गरजेचाच आहे. पाकिस्तान संघाचा पराभव झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा पराभव करत सेमी फायनलचं तिकीट पक्कं करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget