एक्स्प्लोर
LIVE UPDATES | आज राज्यात 5024 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 2362 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात काल विक्रमी 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. काल 3 हजार 661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 63 हजार 343 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 192 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 6 हजार 931 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात काल विक्रमी 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. काल 3 हजार 661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 63 हजार 343 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 192 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 6 हजार 931 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
20:24 PM (IST) • 26 Jun 2020
आज राज्यात 5024 नवीन रुग्णांची नोंद, 2362 रुग्ण कोरोनामुक्त तर आजपर्यंत 79,815 रुग्णांची कोरोनावर मात, तर आज 175 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
20:17 PM (IST) • 26 Jun 2020
मनमानी करणाऱ्या गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून अखेर चाप, घर कामगार व वाहन चालक यांना प्रवेश प्रतिबंधित न करण्याबाबत सहकार विभागाने जरी केले परिपत्रक, लॉकडाऊनच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये प्रवेश बंदी केल्याने वयोवृद्ध रहिवाशी आणि घर कामगारांचे होत होते हाल, मात्र आता सहकार विभागाने सोसायटीच्या आवारात या श्रमिक वर्गाला प्रवेश बंदी नसल्याचे केले स्पष्ट, तसेच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि मनमानी नियम तयार करू नये अशा स्पष्ट सूचना सरकारने गृह निर्माण संस्थांना दिल्या आहेत.
18:47 PM (IST) • 26 Jun 2020
अकोल्याचे वादग्रस्त जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांची अखेर बदली. मुली बेपत्ता प्रकरणातील बेपर्वाई आणि वादग्रस्त कारभार भोवला. 28 फेब्रूवारीला गृहमंत्र्यांनी केली होती अधिवेशनात बदली. तब्बल तीन महिन्यांनंतर अधिक्षक गावकरांच्या बदलीवर कारवाई. 'एबीपी माझा'नं लावून धरलं होतं प्रकरण. जी. श्रीधर अकोल्याचे नवे जिल्हा पोलीस अधिक्षक.
19:19 PM (IST) • 26 Jun 2020
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथे भीषण कार अपघात. पाच जणांचा जागीच मृत्यू, दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश. मुंबईहुन सुरतकडे जाणारी वॅगणार कार डीवाइडरला धडकून विरुद्ध वाहिनीवर गेल्याने घडला भीषण अपघात. तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल.
17:28 PM (IST) • 26 Jun 2020
नवी मुंबईत 29 तारखेपासून शहरात लॉकडाऊन लागू होणार. शहरातील 44 कंटेनमेंट झोनमध्ये 7 दिवसांचा लोकडाऊन असणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत निर्णय. लॉकडाऊन काळात घरोघरी मास स्क्रिनिंग होणार.
Load More
Tags :
Coronavirus In Maharashtra Trending News Coronavirus Cases In Maharashtra Maharashtra Coronavirus Cases Coronavirus Cases Lockdown Unlock Latest Updates Breaking Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
बीड
क्रीडा
Advertisement