(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Live Updates | सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनसाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांना गावबंदी
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. काँग्रेसशासित राज्यात नागरिकत्त्व कायद्याविरोधात ठराव मंजूर करणार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय, महाराष्ट्रात शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
2. निर्भयाच्या नराधमांच्या फाशीचं जगभर लाईव्ह करण्याची महिला संघटनांची मागणी, माहिती प्रसारण मंत्री जावडेकरांना पत्र, कायदेतज्ज्ञांचा आक्षेप
3. बुवाबाजीवरील परिसंवादावेळी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर गदारोळ, भाषणावेळी वक्त्याला रोखलं, तर दिब्रिटोंच्या सरकारवरच्या टीकेवरुन साहित्यिकांमध्ये दोन गट
4. सारथीसंदर्भातला वादग्रस्त जीआर काढणाऱ्या सचिवांची हकालपट्टी करणार, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर संभाजीराजेंचं उपोषण मागे,
5. पालघरमधल्या बोईसरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू, हादऱ्यानं निर्माणधीन इमारतही कोसळली
6. युक्रेनचं विमान चुकून पाडल्याची इराणच्या लष्कराची अप्रत्यक्ष कबुली, दुर्घटनेत 167 जणांचा नाहक मृत्यू, अमेरिका-इराणच्या वादान युक्रेनचा बळी