एक्स्प्लोर

24th January In History: डॉ. होमी भाभा, पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात काय घडलं?

On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 24 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारताच्या अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे, भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा जहांगीर यांचा स्मृतीदिन आहे. त्याशिवाय, ब्रिटनचे माजी पंतप्रधान, नोबेल पुरस्कार विजेत विस्टन चर्चिल, स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांचाही स्मृतीदिन आहे.  तर, मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा वाढदिवस आहे. 

1924: अभिनेत्री हंसा वाडकर यांचा जन्मदिवस (Hansa Wadkar Birth Anniversary)

मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. हंसा वाडकर यांचे मूळ नाव रतन साळगावकर होते. सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल आदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. 'सांगत्ये ऐका' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

1945: सुभाष घई यांचा वाढदिवस (Subhash Ghai Birthday)

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, लेखक-पटकथाकार सुभाष घई यांचा वाढदिवस आहे. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विश्वनाथ, कालीचरण, हिरो, कर्मा, राम-लखन, कर्ज, परदेस, खलनायक, ताल, यादें, आदी गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

1965: विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन (Wiston Charchile Death Anniversary)

दुसऱ्या महायुद्धादरम्यानचे ब्रिटनचे पंतप्रधान असलेले विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन. प्रभावी वक्ता आणि नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती. चर्चिल हे साहित्यिकदेखील होते. त्यांना 1953 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. 

1966: डॉ. होमी भाभा यांचा स्मृतीदिन (Dr. Homi Bhabha Death Anniversary)

भारतीय अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे  डॉ. होमी भाभा यांचा आज स्मृतीदिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर  त्यांच्या पुढाकाराने अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्याचे प्रमुख म्हणून डॉ. भाभा यांनी जबाबदारी सांभाळली. अणू ऊर्जेचा वापर हा शांततेच्या मार्गाने व्हावा, अशी त्यांची ठाम भूमिका होती.  एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले. हा अपघात नसून घातपात असावा अशी शंका घेणारे अनेक चर्चा अधूनमधून सुरू असतात. 

2011: भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतीदिन (Pandit Bhimsen Joshi Death Anniversary)

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा आज स्मृतीदिन. भीमसेन जोशी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' ने गौरवण्यात आले. भीमसेन जोशी हे लोकप्रिय हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम असलेले रामभाऊ कुंदगोळकर यांच्या मार्गदर्शनात भीमसेन जोशी यांनी  हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. भीमसेन जोशी यांनी पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. 

इतर महत्त्वाच्या घडामोडी: 

1857: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना

1916: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणास्तव अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

1942: दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून बँकॉकवर बॉम्बहल्ला; थायलंडने इंग्लंड आणि अमेरिकेविरोधात युद्ध पुकारले. 

1966: भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी पार पडला. 

1976: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे नामकरण.  त्यानंतर 1977 मध्ये पुन्हा नाव बदलून भारत पेट्रोलियम असे नामकरण करण्यात आले.

1984: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

2005: गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी अनुताई लिमये यांचे निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget