एक्स्प्लोर
लातुरात शेततळ्यामध्ये बुडून तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू

लातूर : लातूरच्या उदगीरमध्ये शेततळ्याकडे गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्नेहाधार संस्थेत राहणाऱ्या तिघांसोबत हा दुर्दैवी अपघात घडला. 14 वर्षांचा शुभम मेहत्रे, 16 वर्षांचा ऋषिकेश झाल्टे आणि 13 वर्षांचा भारत भूषण शुक्रवारी शेततळ्याकडे पाणी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात पडून बुडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. बुडालेल्यांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. स्नेहाधार या संस्थेत एड्सबाधित मुलांचे संगोपन केले जाते. संस्थेच्या बाजूला असलेल्या शेततळ्यात ही मुले पोहण्यासाठी गेली असता अपघात झाल्याची माहिती आहे.
आणखी वाचा























