एक्स्प्लोर
नागपूरच्या फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह
नागपुरातल्या फुटाळा तलावात एका तरुण दाम्पत्यानं आपल्या 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागपूर : नागपुरातल्या फुटाळा तलावात एका तरुण दाम्पत्यानं आपल्या 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलेश शिंदे, पत्नी रुपाली शिंदे आणि 5 वर्षांची मुलगी नाहली अशी आत्महत्येत मृत्यू पावलेल्यांची नावं आहेत.
आज (शनिवार) सकाळी नागपूर पोलिसांनी तिघांचे मृतदेह फुटाळा तलावातून बाहेर काढले. त्यामुळे ह्या परिवारानं रात्रीच्या वेळी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शिंदे हे पत्नी आणि मुलीसह तलावाजवळच्या हनुमान मंदिर परिसरात वास्तव्याला होते. त्यांच्या शेजारीच भाऊ आणि इतर नातेवाईक राहत होते. काही दिवसांपूर्वी शिंदे परिवारात भांडणंही झाली होती. मात्र, ती देखील थोड्या दिवसांनी मिटली होती. त्यामुळे शिंदे दाम्पत्यानं मुलीसह आत्महत्या का केली असावी, ह्याचा शोध लावण्याचं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement