Ajit Pawar : अजितदादांचा आणखी एक मोहरा फुटला? आमदाराने उघडपणे सुरु केला साहेबांचा प्रचार??
Ajit Pawar : गेल्या का दिवसांपासून दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने नरहरी झिरवाळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष आहे.
नाशिक : नाशिक लोकसभेला महायुतीचा सावळा गोंधळ सुरू असतानाच दिंडोरीमध्ये सुद्धा महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आलं आहे. दिंडोरीचे लोकसभा उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्त अजित पवार गटाचे आमदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर दिसून आल्याने नाशिकसह दिंडोरीमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे. त्यामुळे दिंडोरीमध्ये सुद्धा आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे का? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंच्या मांडीला मांडी लावलेले नरहरी झिरवळ दिसून आल्याने एकच चर्चा रंगली आहे.
दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने नरहरी झिरवाळ नाराज असल्याची चर्चा
दिंडोरी तालुक्यातील तिसगावमध्ये आज सकाळी भास्कर भगरेंच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्येच नरहर सुद्धा उपस्थित होते. गेल्या का दिवसांपासून दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने नरहरी झिरवाळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत होत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.
छगन भुजबळांनी दिली सावध प्रतिक्रिया
दुसरीकडे, झिरवाळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर दिसल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना नरेश झिरवाळ यांच्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, मला याबाबत काहीही माहित नाही. भगरे आणि ते दिंडोरीमधील असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेला दिंडोरीमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेत विजय
नरहरी झिरवाळ 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत 60 हजारांवर मताधिक्य घेत विजयी झाले होते. दिंडोरीमध्ये त्यांनी सर्वाधिक मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर झिरवाळ यांनी अजित पवारांची साथ सोडल्यास अजित पवार यांना तगडा झटका बसणार आहेच, पण कांद्याच्या मुद्याने अडचणीत आलेल्या मंत्री भारती पवार यांनाही झटका बसण्याची चिन्हे आहेत. दिंडोरीसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या