राज्यात विरोधकच शिल्लक नाहीत, जे आहेत त्यांनी 5 वर्ष आराम करावा, गिरीश महाजनांचा खडसेंना टोला
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना होळी सणाच्या निमित्ताने सर्व रंगाच्या सर्व अंगाच्या शुभेच्छा नेहमीच असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे.
Girish Mahajan : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना होळी सणाच्या निमित्ताने सर्व रंगाच्या सर्व अंगाच्या शुभेच्छा नेहमीच असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. राज्यात सध्या विरोधकच शिल्लक नाहीत, जे थोडेफार आहेत त्यांनी पाच वर्ष आता आराम करावा. काही चांगल्या सूचना असल्यास त्या सरकारला सुचवाव्यात असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. धुलीवंदनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी तरुणांना व्यसना पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
खडसेंच्या आरोपात फार काही तथ्य नाही
जगात भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणाईमुळं भारत सशक्त झाला पाहिजे. त्यासाठी तरुणाई व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे महाजन म्हणाले. तरुणांना नियमित व्यायाम करण्याचा सल्लाही महाजन यांनी दिला आहे. मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी पोलिस आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की, अशा आरोपींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे असे आमचे पाहिल्यापासून मत आहे. या घटनेत आरोपींना अटक करण्यात आली असल्यानं कोणाला वाचवले जात आहे. या खडसे यांच्या आरोपात फार काही तथ्य नाही असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा
आज देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून ते खास लोकांपर्यंत, आज सर्वजण होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. होळीच्या या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय देशभरातील विविध सेलिब्रिटी होळीच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी होळीसोबतच रमजानच्या जुम्माच्या नमाजचा दिवसही आहे. यामुळे देशातील विविध ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहाच्या वातावरणात होळीचा सण साजरा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच राजकीय नेते एकमेतांना टोलेबाजी देखील करताना पाहायला मिळाले. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टोला लगावत त्यांनी पाच वर्ष आराम करावं असं वक्तव्य केलं.
महत्वाच्या बातम्या:
Girish Mahajan: विरोधकांना चारी मुंड्या चीत केलं म्हणून देवा भाऊ केसरी कुस्ती स्पर्धा; मंत्री गिरीश महाजनांचा मिश्किल टोला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
