एक्स्प्लोर
कोल्हापुरात गेल्या 24 तासांमध्ये 5 गाड्या पाण्यात सापडल्या

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या 24 तासांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 गाड्या पाण्यात सापडल्या आहेत. यात चार दुचाकी तर एका मारुती कारचा समावेश आहे. पाण्यात टाकण्यापूर्वी या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.
कोल्हापूरमध्ये चोरीच्या गाड्या पाण्यात टाकण्याचं सत्र सुरुच आहे. रंकाळा खण परिसरातून काल सोमवारी 4 दुचाकी बाहेर काढण्यात आल्या होत्या, आज पंचगंगेच्या नदीपात्रातून 1 मारुती 800 बाहेर काढण्यात आली आहे. या गाडीचीही तोडफोड करण्यात आली आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कार सापडली आहे.
शहरात गाड्यांची चोरी करुन त्या पाण्यात टाकण्याच्या घटनांमुळे गुढ निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकारामागे कुणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
रंकाळा खणीतून 4 दुचाकीही पाण्याबाहेर
सोमवारी दुपारी रंकाळा खण परिसरात पोहायला गेलेल्या तरुणांना 4 दुचाकी पाण्यात आढळल्या. अग्नीशमन दलाला पाचारण करुन त्या पाण्याबाहेर काढण्यात आल्य़ा. या सर्व गाड्या चोरीच्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
