एक्स्प्लोर
ठाण्यात एक कोटींच्या हजार-पाचशेच्या जुन्या नोटा जप्त
ठाणे : चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा पकडण्याच सत्र अजूनही संपलेलं नाही. ठाण्यातील तलावपाळी परिसरात दोन इसमांकडून जुन्या पाचशे आणि हजाराच्या एक कोटी रकमेच्या नोटा जप्त केल्या आहेत.
ठाणे सोनसाखळी विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई करत, दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या दोन्ही इसमांकडून 7 हजार 90 जुन्या पाचशेच्या नोटा, तर 6 हजार 455 जुन्या हजारच्या नोटा अशा एकूण एक कोटी रुपयांची रक्कम जप्त केली.
मनोज छेडा आणि प्रथमेश गावंडे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावं आहेत. मनोज छेडा हा फायनान्सचा व्यवसाय करतो. एका बांधकाम व्यवसायिकाची ही एक कोटींची रक्कम असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement