Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने मुरुड रेवदंडा परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेतील आरोपी फरार असून पुढील घटनेचा तपास रेवदंडा पोलिस करत आहेत.
Thane Crime: रायगडच्या मुरुड तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरुडच्या कोर्लई येथे बोटीत अल्पवयील मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assualt) केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेवदंडा पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने मुरुड रेवदंडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्यात सुरु आहे.
सध्या नाताळ आणि नववर्ष अशा लागून सुट्ट्या काढत अनेकजण कोकण, गोवा अशा पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जात आहेत. शाळांच्या सहलीही मुरुड जंजीरा, कोर्लई, अलिबाग अशा ठिकाणी सर्रास जाताना दिसत असताना लैगिंक अत्याचाराची ही घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली असून पर्यटकांसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
कोर्लईत बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
रायगड तालुक्यातील कोर्लई येथे बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. रेवदंडा पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आर्यन दीपक कोटकर असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने मुरुड रेवदंडा परिसरात खळबळ उडाली आहे.घटनेतील आरोपी फरार असून पुढील घटनेचा तपास रेवदंडा पोलिस करत आहेत.
खेळण्याचं आमिष दाखवून अश्लील कृत्य
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्याच्या (bhiwapur Taluka) दिघोरा गावात एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र पसारेने काल दुपारी घरासमोर खेळत असलेल्या 8 वर्षीय दोन मुलींना खेळणं देतो, असे आमिष दाखवून शेजारीच असलेल्या आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींसोबत अश्लील कृत्य करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे घाबरून एक मुलगी बाहेर पळून गेली.
विनयभंग करणाऱ्या नराधमास अटक
तर दुसरी चिमुकली तिथेच अडकली. तिच्या सोबत आरोपीने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक छेडखानी केली. नंतर पीडित मुलीने आपल्या घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितला. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने पीडितेचे घर गाठून सर्व माहिती जाणून घेतली आणि त्यांना तक्रार देण्यासाठी हिंमत दिली. अखेर संध्याकाळी उशिरा कुटुंबीयांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: