एक्स्प्लोर

ठाकरे गटाचे आमदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर; ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उधाण

Nitin Deshmukh ACB Inquiry : अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख  (Nitin Deshmukh) पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

Nitin Deshmukh ACB Inquiry : अकोला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola News) बाळापुरचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख  (Nitin Deshmukh) पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Buero) आमदार नितीन देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानांच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली आहे.

अमरावतीच्या एसीबीच्या पथकाने अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषदेचा वापरलेला विकास निधी, झालेली कामे आणि सदस्य म्हणून घेतलेले भत्ते, याबद्दल संपूर्ण माहिती मागवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे आहे. 

 ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उधाण

आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 या काळात अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. दरम्यानच्या काळात काही गैरप्रकार तर झाला नाही ना, त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. याआधी 'अमरावती एसीबी'ने बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी 17 जानेवारी 2023 रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मात्र, ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता परत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख यांच्या संदर्भातली फाईल उघडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन 

यवतमाळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कृषी सहाय्यक देण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आहे. वारंवार मागणी आणि समस्या सांगूनही कुठलीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने आज एका शेतकऱ्याने कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांना फ़ोन केला असता ते उद्धटपणे बोलले, असा आरोप शेतकाऱ्याने केला आहे. अशातच हे संतप्त शेतकरी कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात आले असता जिल्हा कृषी अधीक्षक गैरहजर असल्याने शेतकऱ्यांचा पारा आणखीन भडकला अन् कार्यालयात कपडे काढून त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. 

पदभार असलेल्या अतिरिक्त कृषी सहायक अरेरावी करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत भ्रमणध्वनीवरून आंदोलक शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र समाधान न झाल्याने आंदोलक शेतकरी संतप्त होऊन त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Embed widget