एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नंदुरबारमधील तोरणमाळमध्ये तापमान एक अंशावर
नंदुरबार जिल्ह्यात सध्या हुडहुडी वाढली असून शहरी भागात तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. तर नंदुरबारचं महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ डाब मोलगी परिसरात तापमान 1 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सध्या हुडहुडी वाढली असून शहरी भागात तापमान 3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. तर नंदुरबारचं महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ डाब मोलगी परिसरात तापमान 1 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिकच घसरल्याचं दिसून येत आहे.
सध्या राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच्या तोरणमाळ डाब मोलगी परिसरात हुडहुडणारी थंडी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक गावात दवबिंदू गोठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सकाळी उशीरापर्यंत सामसूम दिसत आहे.
तोरणमाळला नंदुरबारचे महाबळेश्वर असं संबोधले जाते.तसेच महाराष्ट्राचा दोन नंबरचा थंड हवेचा ठिकाण म्हणूनही तोरणमाळची ओळख आहे. मात्र थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला थंडीचा तडाखा बसला आहे. अधिक थंडी असल्याने पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळमध्ये पर्यटकही दिसेनासे झाले आहेत. आज तापमानाचा पारा आणखी खाली घसरेल, अशी शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement