एक्स्प्लोर

Sushma Andhare: सुषमा अंधारेंची तोफ पुन्हा सज्ज; दुसऱ्या टप्प्यात 40 सभा, यात्रेचा नारळ फुटणार फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात

MahaPrabodhan Yatra: महाप्रबोधन यात्रेदरम्यान तब्बल 40 सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सभेचा श्रीगणेशा फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे.

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray)  गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रेला पु्न्हा सुरूवात होणार आहे. प्रबोधन यात्रेला 14 ऑक्टोबरपासून सुरूवात होणाार आहे. महाप्रबोधन यात्रेची पहिली सभा फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. तर शेवटची सभा वरळीत होणार आहे. महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरात 40 सभा होणार आहेत. 

महाप्रबोधन यात्रेदरम्यान तब्बल 40 सभांचे नियोजन

राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिंदे-फडणवीस- पवार  सरकारचा ढिसाळ कारभार,  सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी केलेलं नियोजन हाणून पाडण्यासाठी  त्याचा पर्दाफाश करण्यासाठी दृष्टिकोनातूनच उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सभा होणार आहे. महानगरीय आणि उपनगरीय भागातून सुरू होत असलेल्या या महाप्रबोधन यात्रेदरम्यान तब्बल 40 सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सभेचा श्रीगणेशा फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे सभा अमरावती, वाशिम, यवतमाळ, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी , नाशिक धुळे, नंदुरबार, पनवेल, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, मुंबई या ठिकाणी होणार आहे. समारोपीय सभा वरळी येथे होणार आहे. सुषमा अंधारे आणि महाराष्ट्रातील इतर शिवसेनेचे नेते देखील या महाप्रबोधन यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत.
सुषमा अंधारे यांच्या पहिल्या यात्रेला राज्यभरात सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दौऱ्यातून आगामी लोकसभेसाठी बंडखोरांविरोधात काही संकेत देणार का? याचीही उत्सुकता  आहे.

सुषमा अंधारे शिवसेनेची ढाल 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पहिल्या महाप्रबोधन यात्रेचा जिल्हास्तरावरील समारोप  20 मे रोजी बीडमध्ये झाला होता.  संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून पक्षाला कमतरता भासू लागली. त्यानंतर दुसऱ्या पक्षातून आलेले आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर ही धुरा आली. यातुनच पक्षाची आक्रमक भुमिका मांडणारे महत्वाचे नेते म्हणून भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांचा उदय झाला.  संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यामध्ये कारवाई संदर्भात दहशत निर्माण झाली. त्यामुळे मोजके नेते सोडले तर फार विरोधकांवरती कोणी आक्रमक बोलायला तयार नव्हतं. शिवसेनेसमोर संकट उभं असताना सुषमा अंधारे शिवसेनेची ढाल बनल्या होत्या. 

हे ही वाचा :                               

Prakash Ambedkar : ठाकरेंचा आणि आमचा साखरपुडा झालाय, मात्र लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजीचे अडथळे; प्रकाश आंबेडकरांचे चिमटे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Embed widget