एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput: सुशांतसिंह प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी

भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची  फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागपुरात तसे संकेत दिलेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत या प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलीय. 

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावानं आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न खासदार शेवाळे यांनी लोकसभेतल्या भाषणादरम्यान उपस्थित केला. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ए यू म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आदित्य-उद्धव असल्याचं खळबळजनक वक्तव्य राहुल शेवाळे यांनी सभागृहात केलंय. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहे. 

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नितेश राणे यांनी देखील विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची  फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे. नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना  विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा.  8 जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? Cctv का गायब झाले?  visitor book चे त्या 2 दिवसांचे पान का फाडले गेले?  हे प्रश्न अनुत्तरीत आहे

 शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडात खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळं सध्या ते शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आहेत. आपण आदित्य ठाकरे यांच्यावर कोणताही आरोप केला नसून, एयू म्हणजे नेमकं कोण एवढाच प्रश्न आपण विचारल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण हा प्रश्न उपस्थित करण्यामागे राहुल शेवाळे यांचा नेमका हेतू काय होता, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100 टक्के निकाल, 14 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
प्रदेशाध्यक्ष होतो आता मुख्यमंत्री झालो, त्यामुळं पेंडिंग काही नाही, दिल्लीवारीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget