विनापरवाना वापरला शासकीय भूखंड, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यावर नियमभंगाचा ठपका
सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांच्यावर शासकीय भूखंड वापराबाबत नियमभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Suresh Wadkar : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांच्यावर शासकीय भूखंड वापराबाबत नियमभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. जुहू तारा रोड येथील भूखंड वापरात नियमबाह्य काम केल्याचा ठपका मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर ठेवण्यात आला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व कलेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने अकादमी उभारण्यासाठी सरकारने दिलेल्या भूखंडाचा वापर गुरुकुल अकादमी उभारण्यासोबत निवासी कामासाठी विनापरवाना केल्याची माहिती उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कारवाईसाठी राज्य सरकारनं आदेश द्यावेत
संस्थेकडून विनापरवानगी एका शाळेसाठी जागा वापरली जात असल्याचे सुद्धा तहसीलदारांच्या अहवालामध्ये समोर आल्याची माहिती मिळाली आहे. यावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने द्यावेत, अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय शाळेसाठी विनापरवानगी भाड्यावर जागा देणे, विनापरवानगी निवासी वापर इत्यादी निरीक्षणे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे निर्णयात नोंदवण्यात आली आहेत. तसेच शर्तभंगाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी योग्य तो आदेश देण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.
या जागेवर बिलबाँग हाय इंटरनॅशन स्कूल सुरु
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतन ट्रस्टला (आजिवसन) भारतीय शास्त्रीय संगीत व कलेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशासाठी अकादमी उभारण्यासाठी सरकारनं दोन भूखंड दिल्यानंतर त्याठिकाणी हे गुरुकुल उभारण्यात आले आहे. मात्र, ‘संस्थेकडून विनापरवानगी निवासी वापर होत असल्याचे दिसून आले. तसेच या जागेवर बिलबाँग हाय इंटरनॅशन स्कूल सुरु आहे. तहसीलदारांच्या अहवालानुसार या कार्यालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, संस्थेने या शाळेसोबत सन 2006 पासून भाडेकरारनामा केल्याचे दिसते. सबब ट्रस्टने मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.
दरम्यान, सुरेश वाडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे भूखंडासाठी विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्जाविषयीची पडताळणी केली. त्यानुसार, 8260 चौ. फुटांचा भूखंड क्रमांक 3 (सिटीसर्व्हे 1052) वाडकर यांच्या संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर गुरुकुलच्या विस्तारासाठी लगतचा भूखंड मिळण्यासाठी वाडकर यांनी विनंती केली असता, 8070 चौ. फुटांचा भूखंड क्रमांक 4(सिटीसर्व्हे 1052) संस्थेला देण्याचा निर्णय सरकारने 9 एप्रिल, 2003रोजी घेतला. कब्जेहक्काने प्रदान करण्यात आलेल्या या भूखंडांवर संस्थेने दोन इमारती उभारल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Sachin Goswami On Suresh Wadkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा सुरेश वाडकरांना टोला, तुजं नमो गायक...



















