एक्स्प्लोर

Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड

Sujata Saunik IAS Maharashtra : सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी काम केलं असून आता त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक  (Sujata Saunik IAS) यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. 

सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत.

पती आणि पत्नी मुख्य सचिव

सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम केलंय. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 

नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार, 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामध्ये सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

कोण आहेत सुजाता सौनिक? (Who Is Sujata Saunik)

सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्कामManoj Jarange Drone : मनोज जरांगेंच्या घरावरील ड्रोन द्वारे टेहाळणीची चौकशी होणार?Ramdas Athawale : Rahul Gandhi हिंदूंना दहशतवादी म्हणाले ते स्वत:च दहशतवादी - रामदास आठवलेABP Majha Headlines : 1PM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
'लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका', राजू शेट्टींचा दूध दरावरून सरकारला इशारा
Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डोमेसाइलची जाचक अट रद्द करा; शिवसेना नेत्याची मागणी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाला खडबडून जाग, भुशी डॅम परिसरातील चहा,भजी, कणीस विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले
Manoj Jarange : मध्यरात्री घराभोवती ड्रोनच्या घिरट्या, मराठा आंदोलक धास्तावले; मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
मध्यरात्री घराभोवती ड्रोनच्या घिरट्या, मराठा आंदोलक धास्तावले; मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमतातून जलजीवन मिशनमध्ये मोठा भ्रष्टाचार; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप 
कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमतातून जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच आरोप 
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला, उबाठा तीन नंबरवर'; विजयानंतर किशोर दराडेंना मुख्यमंत्र्यांचा कॉल, काय झाली चर्चा?
Akshay Kumar Helps Jackky Bhagnani :  फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले?  अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
फ्लॉप चित्रपटाने प्रोडक्शन हाऊसचं नुकसान, अक्षय कुमारने निर्मात्यांना काय सांगितले? अखेर समोर आली 'ती' गोष्ट...
Embed widget