एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Jagdamba Sword: शिवरायांची जगदंबा तलवार 2024 पर्यंत ब्रिटनमधून परत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

छत्रपती शिवरायांची पूजेची जगदंबा तलवार (Jagdamba Sword) ही सध्या ब्रिटनमध्ये असून ती महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. 

मुंबई: महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी असून शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत ही तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे. 

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्षे पूर्ण होतील. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करत असून यावेळी जर जगदंबा तलवार भारतात परत आली तर आमचा आनंद द्विगुणित होईल.

आज शिवप्रताप दिन साजरा केला जात असताना प्रतापगडावरील अफजलखानच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं गेलं. त्याचवेळी आज आणखी एक महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. साधारणपणे 1875 ते 1876 च्या दरम्यान ही तलवार महाराष्ट्रातून ब्रिटनला गेली. त्यावेळचे प्रिन्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जगदंबा तलवारीची समावेश होता. 

शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली ही जगदंबा तलवार जर महाराष्ट्रात परत आली तर ती आनंदाची बातमी असणार आहे. 

प्रिन्स ऑफ वेल्सने जबरदस्तीची भेट घेतली 

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत जगदंबा तलवारीसंबंधी  माहिती देताना म्हणाले की, "करवीर छत्रपतींच्याकडे शिवरायांच्या वापरातील एक तलवार होती. तिची नोंद कोल्हापूरच्या शस्त्रागारामध्ये जगदंबा अशी करण्यात आली होती. करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज, जे त्यावेळी 11 वर्षांचे होते, त्यावेळी म्हणजे 1875 साली ब्रिटिश प्रिन्स ऑफ वेल्स भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी तो भारतातील अनेक शस्त्रं घेऊन गेला. करवीर छत्रपतींकडून त्याने ही तलवार जबरदस्तीने भेट म्हणून घेतली होती. ही तलवार छत्रपती शिवरायांच्या वापरातील असल्याचं ब्रिटिशांच्या कॅटलॉगमध्ये नोंद आहे. ही तलवार परत आणावी यासाठी 19 व्या दशकामध्ये अनेकांनी प्रयत्न केले होते. आता ही तलवार परत आणल्यास आम्हा इतिहास प्रेमींना आनंदच होईल."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special ReportRam Shinde on Ajit Pawar : निवडणुकीत आलेल्या अपयशापेक्षा  कट रचून पराभव केला गेला याचं दु:खBharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget