एक्स्प्लोर

Subramanian Swamy on Maharashtra Government : 'हिंदू धर्म महाराष्ट्र सरकारपासून वाचवण्याची गरज'; भाजप नेत्यानेच दिला घरचा आहेर!

सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्र सरकारने विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचा कारभार हाती घेतल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

Subramanian Swamy on Maharashtra Government : माजी राज्यसभा खासदार, ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रावर जोरदार टीका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर मंदिर कायद्याबाबत महायुती सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याला महाराष्ट्र सरकारपासून हिंदू धर्म वाचवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

पंढरपूर मंदिर कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा उल्लेख स्वामी यांनी केला आहे. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, पंढरपूर मंदिर कायदा भाविकांच्या हक्कांवर गदा आणत नाही, परंतु 'पुजारी वर्गाच्या क्रूरतेपासून' त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहे.

स्वामी यांच्याकडून जनहित याचिका

सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेसह लाइव्ह लॉचा एक लेखही शेअर केला आहे. या लेखात पंढरपूर मंदिर कायद्याच्या मुंबई उच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीचा उल्लेख आहे. X वर ट्विट करताना त्यांनी लिहिले की, आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या असंस्कृत लोभापासून हिंदू धर्माला वाचवायचे आहे.

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने सांगितले की, पंढरपूरमधील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरांवर महाराष्ट्र सरकारचे नियंत्रण करणारा पंढरपूर मंदिर कायदा 1973 हा धर्मनिरपेक्ष भाविकांना आणि यात्रेकरूंना पुरोहित वर्गाच्या क्रूरतेपासून मुक्त करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. 

सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्र सरकारने विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचा कारभार हाती घेतल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात ही माहिती दिली.

काय आहे पंढरपूर मंदिर कायदा?

पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 अन्वये महाराष्ट्र सरकारने पंढरपूरमधील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरांचा कारभार पाहण्यासाठी पुजाऱ्यांचे वंशपरंपरागत अधिकार आणि विशेषाधिकार रद्द केले होते. या कायद्यामुळे आता मंदिरांच्या प्रशासनावर आणि पैशांच्या व्यवस्थापनावर सरकारचे नियंत्रण आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Ashok Kharat Crime News: भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा, जमीन खरेदीसाठी चक्क नॅशनलाईज बँकेचा वापर, आर्थिक व्यवहारातील भागीदारही SIT च्या रडारवर
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा, जमीन खरेदीसाठी चक्क नॅशनलाईज बँकेचा वापर, आर्थिक व्यवहारातील भागीदारही SIT च्या रडारवर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Embed widget