Student Protest : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर, कोरोना नियमांचा फज्जा
Student Protest :ऑफलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी मुलं रस्त्यावर उतरली असताना कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता सरकार या दबावाला बळी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
![Student Protest : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर, कोरोना नियमांचा फज्जा student protest against SSC HSC offline exam in nagpur mumbai aurangabad hindustani bhau Student Protest : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर, कोरोना नियमांचा फज्जा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/d78a5caeebdcb7c244ff96423a3b4579_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान ऑफलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी मुलं रस्त्यावर उतरली असताना कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता सरकार या दबावाला बळी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलय. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत या निर्णयाबाबत वेट अन्ड वॉचची भूमिका असून दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलायचा की नाही? ते त्या वेळच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवलं जाईल, असाही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलाय. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा प्रस्ताव शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समोर ठेवला आहे. त्यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा परीक्षा संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बोर्डाचा अभ्यासक्रम ऑनलाईन ऑफलाईन शिकवत शाळेने जरी पूर्ण केला असला तरी स्वतःला तयारीसाठी आणखी पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलली तर अभ्यासाची तयारी पूर्ण होईल ,असं काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर परीक्षा वेळापत्रकनुसार झाली तर पुढे परीक्षांचा निकाल , अकरावी प्रवेशप्रक्रिया वेळेत होतील. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या प्रकारचे संभ्रमाचे वातावरण राहणार नाही असं सुद्धा काही पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Hindustani Bhau Video: हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडिओनंतर दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक?
बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, पाहा लाईव्ह अपडेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)