Student Protest Live Updates : बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, पाहा लाईव्ह अपडेट
student protest Live Updates : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात. या मागणीसाठी अचानकपणे शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे.
LIVE
Background
student protest Live Updates : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात. या मागणीसाठी अचानकपणे शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे. परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. मुंबई, उस्मानाबाद, औरंगाबाद, नागपूरसह अनेक शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी बसची तोडफड केली आहे.
नागपूरमध्ये पोलिसांनी काही निवडक विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत नेले, त्यानंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. दरम्यान दहा दिवसात प्रशासनाने आमच्या मागण्या संदर्भात निर्णय घेतला नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन करू... राज्याच्या मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे... त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागे त्यांना चिथावणी देणारा कोण??? आणि त्याचा उद्दिष्ट काय??? हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही....
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेज प्रमाणे हिंदुस्तानी भाऊ नावाच्या युट्युबरचे व्हिडिओ पाहून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करू आणि विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा कोण आहे... त्याचा शोध घेऊ असं मत व्यक्त केलं आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचेही सांगितलेय.
सध्यातरी दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेवर आणि ऑफलाईन होणार, विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये : शिक्षणमंत्री
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शनिवारी म्हणाल्या की, "राज्यमंत्र्यांची दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत बैठक झाली आहे. खूप गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊ. पुरवणी परीक्षा असते, त्यांना परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुनः परीक्षेला बसवाव लागतं. त्यानंतर अॅडमिशन होतं. बऱ्याच गोष्टी एकावर एक आधारित असतात. त्यामुळे विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. आम्ही बोर्ड, एसइआरटीशी चर्चा करत आहोत. विचार करून निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयावर पुढेच निर्णय अवलंबून आहेत."
"शिक्षणात क्लासरूमचा फिल येत नाही. तोपर्यंत इनटरअॅक्टिव्ह सेशन येत नाही, तरी मिस होत असतं. अकरावीचे अॅडमिशन ऑनलाईन व्हावं अशा आमच्या अपेक्षा आहेत. पुढचं वर्ष विद्यार्थ्यांचं वेळेत सुरु व्हायला हवं, हिच अपेक्षा. पंधरा तारखेपर्यंत आढावा घेऊन भूमिका ठरवू. तसेच, शिक्षक संघटना, शिक्षणतज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक या सगळ्यांशी चर्चा करून आराखडा ठरवू.", असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतिलं आहे. तसेच सध्यातरी वेळेवरच परीक्षा होतील आणि ऑफलाईन परीक्षा होतील, अशी शक्यता असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड धारावीत
जळगावमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
बीडमध्ये विद्यार्थ्यांचं रॅली काढत आंदोलन
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात, ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. राज्यात सुरु असलेल्या एसटी संपामुळे, गावखेड्यातील बस अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षणासाठी येता येत नाही. जर खाजगी वाहनांनी यायचं म्हटलं तर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळं ऑफलाइन परीक्षा घेतल्या तर आमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. यामुळे बोर्डाने ठरवलेले ऑफलाइन पेपर हे ऑनलाइन घेण्यात यावेत. ही मागणी घेऊन बीडमध्ये विद्यार्थ्यांनी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे...
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या, कोल्हापुरातही विद्यार्थ्यांचं आंदोलन
दहावी- बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी अशी मागणीसाठी आज मुंबई विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी देखील याच मागणीसाठी आंदोलन केलं. कोल्हापुरातील एसएससी बोर्ड कार्यालयाबाहेर एकत्र जमत केलं.ज्यात पालकांनी ही सहभाग घेतला. या आंदोलक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सरकारच्या धोरणाचा निषेध केला. शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झालेले असताना परीक्षा ऑफलाइन का? असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय इतकच नाही तर ऑफलाइन परीक्षेदरम्यान कोरोना संसर्ग वाढल्यास त्याची जबाबदारी घेणार का? अशी देखील विचारणा या विद्यार्थी आणि पालकांनी केलीय
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पोलीस आयुक्तांना आदेश
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिथे जिथे आंदोलन होतंय तेथील गर्दी नियंत्रणात आणा, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.