एक्स्प्लोर

12 आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू, महाराष्ट्र सरकारने कारवाईचे केले समर्थन 

12 आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आज पुन्हा आपल्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.

नवी दिल्ली : विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनावरुन सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आज पुन्हा आपल्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील सुंदरम युक्तिवाद करत आहेत. मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 60 दिवसांपेक्षा अधिक काळ आमदारांचे निलंबन करता येणार नाही असे म्हटले होते. पण नियमाप्रमाणे हे 60 दिवस कॅलेंडरप्रमाणे 60 दिवस नव्हे तर अधिवेशन काळातले (सभागृहातले) 60 दिवस असतात, हे महाराष्ट्राच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले आहे. त्यामुळे आता यावर अंतिम निर्णय काय होतो ते पाहावे लागेल. मात्र, आज कदाचित निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता देखील आहे.

पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. या आमदाराने निलंबन मागे न घेतल्यामुळे भाजपाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या आमदाराचे निलंबन हे कायद्याच्या आधारानेच केले होते, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारने कोर्टात मांडली आहे. विधानसभेतील भाजपचे 12  निलंबित आमदाराच्या प्रकरणी 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्यावेळी विधानसभेने निलंबित केलेल्या 12 आमदारांवर कायद्याच्या आधारेच निर्णय घेण्यात आला असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आला होता. त्यानंतर पुढची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्राकडून इंम्पिरीकल डेटा मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता.  त्यानंतर या 12 आमदारांनी निलंबनाच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

निलंबीत करण्यात आलेल्या 12 आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचा समावेश आहे. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Ganesh Naik on Eknath Shinde: बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget